Akola News: Registered farmers are waiting to buy cotton, farmers are suffering due to lack of staff 
अकोला

नोंदणीकृत शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतिक्षेतच, कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांना त्रास

सकाळ वृत्तसेेवा

मानोरा (जि.वाशीम)  ः तालुक्यातील आधारभूत किमंत व्दारे कापूस खरेदी व्हावी यासाठी एक हजार शेतकऱ्यांने बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. तेव्हा येथे कापूस खरेदी सुरू होते की, नाही याकडे लक्ष ठेऊन बसलेले नोंदणीकृत शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

यासाठी बाजार समितीचे सभापती गोविंद चव्हाण, उपसभापती राजेश नेमाने व संचालकाच्या वतीने नागपूर येथील पणन महासंघाला वारंवार दूरध्वनी वरून विनंती करण्यात आली परंतु, त्यांच्याकडे कर्मचारी नाही असे उत्तर मिळत आहेत? याविषयी पणन महासंघाचे तथा अकोला बाजार समितीचे सभापती शिरीश धोत्रे यांना निवेदन देण्यात आले.


बाजार समिती एवढाच न थांबता वाशीम जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्याशी संपर्क साधला परंतु, काहीच होत नसल्याने शेतकऱ्यांना अजून प्रतिक्षाच करावी लागणार आहे. येथे पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू होणार या आशेवर एक हजार शेतकऱ्यांने बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. परंतु, अद्याप पावतो पणन महासंघाची खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कापूस खरेदी केव्हा सुरू होणार या संदर्भात शेतकरी बाजार समितीला विचारणा करत आहे. परंतु, पणन महासंघाची कोणत्याही प्रकारचे आदेश येत नाहीत. बाजार समितीच्या वतीने शिरीष धोत्रे संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाडे, पणन महासंचालक नागपूर यांच्याकडे दिले आहेत. या संदर्भात आमदार राजेंद्र पाटणी यांनी पणण सचिवांना पत्रही दिले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

Latest Marathi News Live Update : लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कॅप्टन खरातच्या ऑफिस बॉयवरही गुन्हा दाखल

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

Prajwal Revanna Case : 13 हजार पानांचं आरोपपत्र, 70 पेनड्राइव्ह, 39 आरोपी अन् अंगावर काटा आणणारे पुरावे; माजी खासदाराच्या 'त्या' अश्लील व्हिडिओंचं सत्य समोर!

SCROLL FOR NEXT