Akola News: Today is the last day to pay crop insurance for the rabbi season 
अकोला

रब्बी हंगामासाठी पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा : प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2020-21 रब्बी हंगामाकरिता लागू करणेबाबत शासनाने 29 जूनच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता दिलेली आहे. रब्बी हंगाम सन 2020 अंतर्गत सदर योजनेत सहभाग नोंदविण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2020 असून उद्याचा शेवटचा दिवस आहे.

यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-21 विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची जिल्ह्यासाठी निवड केली आहे.

या कंपनीचा पत्ता ब्लॉक ए, हेरिटेज हाउस, तळ मजला,6 अ, रमाबाई आंबेडकर, पुणे -411001 असा आहे. कंपनीला टोल फी क्र. 18001035499 आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे.

तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू, भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी न.म.नाईक यांनी केले आहे. शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता दर (प्रती हेक्टरी), पीक, विमा संरक्षित रक्कम (प्रती हेक्टरी) : गहू- विमा संरक्षित रक्कम 38 हजार रुपये, विमा दर 570 रुपये प्रती हेक्टरी, हरभरा - विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये, विमा दर 525 रुपये प्रती हेक्टरी, रब्बी कांदा : विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये, विमा दर 4000 रुपये प्रती हेक्टरी राहणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT