Akola News: Weekly market tremors; As he did not give the mobile, he stabbed the injured boy and injured him
Akola News: Weekly market tremors; As he did not give the mobile, he stabbed the injured boy and injured him 
अकोला

आठवडी बाजारातील थरार;  मोबाईल दिला नाही म्हणून चाकूने सपासप वार करून अस्पवयीन मुलाला केले जखमी

सकाळ वृत्तसेेवा

मालेगाव (जि.वाशीम) :  तुझा मोबाईल मला का देत नाही ? या कारणावरून मालेगाव येथील आठवडी बाजारामध्ये एका पानटपरी चालकाने लोखंडी विळे विकणाऱ्या एका १६ वर्षीय मुलावर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. मुलाला जखमी केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.


नितेश सुभाष चव्हाण (वय १६) रा. तालुका परतुर जिल्हा जालना हल्ली मुक्काम मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तो व त्याचे कुटुंबीय लोखंडी विळे तयार करून गावोगावी विकण्याचे काम करतात.

मंगळवारी (ता. ८) फिर्यादी हा येथील आठवडी बाजारामध्ये विळे विकत असताना धांदल चौकातील पानटपरीवर पान घेण्यासाठी थांबला होता. तेवढ्यात त्याला मोबाईल कॉल आला असता त्यावर तो मोबाईल वर बोलत होता.

तेव्हा पानटपरीच्या बाजूला असलेल्या गणेश विजय दाभाडे उर्फ माया रा. गांधीनगर याने त्याला तुझा मोबाईल दे असे म्हटले असता फिर्यादी नितेशने त्याला नकार दिला.

तेव्हा आरोपीने त्याच्या जवळील धारदार चाकूने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या छातीवर व हातावर जोरदार वार केले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या लोकांनी आरोपी दाभाडे ला पकडल्यामुळे तो सुटला आणि पळतच जखमी अवस्थेत घरी गेला.

त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन घटनेसंदर्भात लेखी दिली. त्यावरून स्थानिक पोलिसांनी आरोपी गणेश दाभाडे उर्फ माया याच्याविरुद्ध भादविच्या विविध कलमा नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गव्हाणे हे करीत आहेत. फिर्यादी हा सध्या वाशीम येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून, आरोपी गणेश दाभाडे हा अजूनही फरार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT