Akola News: Women hit the office of Guardian Minister Bachchu Kadu for banning alcohol 
अकोला

दारूबंदीसाठी महिलांची पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयावर धडक

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  गावात दारूबंदी करण्यात यावी यामागणी साठी बार्शीटाकळी तालुक्यातील शेलगाव येथील महिलांनी गुरूवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पालकमंत्री बच्चू कडू यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. यावेळी महिलांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या सुद्धा दिला.


बार्शीटाकळी तालुक्यातील शेलगाव येथे दारू विक्री करण्यात येते. त्यामुळे गावातील पुरुष दारू पिऊन महिसांसोबत वाद करतात. त्यासोबत ग्रामस्थांचे सुद्धा एकमेकांसोबत वाद होतात.

काही लोक गावात हाथभट्टीची दारू बनवून विकत असल्याने गावातील सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. ही बाब लक्षात घेवून गावात दारू बंदी करण्याच्या मागणीसाठी गावातील महिलांनी गुरूवारी (ता. १७) पालकमंत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयात धडक दिली. यावेळी महिलांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुद्धा केले व दारूबंदीच्या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांच्या नावे दिले.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त! चांदीच्या भावतही घसरण; आजचा ताजा भाव पाहा

Satara Rain: साताऱ्यात पावसाची दमदार हजेरी! महाबळेश्वरमध्ये १६८ मि.मी. मुसळधार; पश्चिम भाग ओलाचिंब, पूर्वेकडील तालुक्यांत प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची एनडीआरएफकडून सुखरूप सुटका

बॉलीवूडची पुन्हा एकदा 'कॉपी पेस्ट'? आलिया-शर्वरीचा 'अल्फा' रिलीज होताच ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेटकरी म्हणाले...

Pandharpur News : पंढरपुरात धार्मिक स्थळावर दगडफेक, शहरात तणावाचे वातावरण; पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT