Akola Sakal
अकोला

Akola : अखेर ‘त्या’ शाळेच्या बांधकामासाठी दिली परवानगी; ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच अधिकाऱ्यांचे उघडले डोळे

याबाबत ‘सकाळ’ने ता. १६ जुलै रोजीच्या अंकात ‘महान येथील ५७ वर्ष जुनी मराठी शाळेची भिंत पडली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच...

सकाळ डिजिटल टीम

महान - येथील पाटबंधारे वसाहतमधील ५७ वर्ष जुनी जि.प.कनिष्ठ मराठी शाळा एकाच इमारतीत होती. शाळेची इमारतसह वसाहतीतील सर्व कॉटर अति जीर्ण झाल्याने भिंती कोसळण्यास सुरुवात झाली असून, शाळेची इमारत शिकस्त झाल्याने गत काही दिवसाआधी शाळेची भिंत पूर्ण कोसळली होती.

याबाबत ‘सकाळ’ने ता. १६ जुलै रोजीच्या अंकात ‘महान येथील ५७ वर्ष जुनी मराठी शाळेची भिंत पडली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाने शाळेला नवीन इमारत बांधण्याची परवानगी दिल्याचे मुख्याध्यापिका निलांगी देशमुख यांनी माहिती दिली.

येथील ५७ वर्ष जुन्या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थी आहेत. या शाळेत गनी कॉलनी, साई नगर, विपुल कॉलनी, पाटबंधारे वसाहत आणि एकवीस महेल या भागातील मुलांना खूप सोईची ठरत असल्याने या शाळेतील मुलांना येथील बस स्थानकावरील शाळेत जाण्याची गरज भासत नसल्याने लहान चिमुकले स्वतः या शाळेत जा-ये करतात.

ही शाळा पाटबंधारे विभागाच्या मालकीची असल्याने या ठिकाणी जिल्हा परिषद विभाग नवीन इमारत बांधू शकत नव्हती. जीर्ण झालेल्या शाळेची भिंतही कोसळी सुदैवाने त्यावेळी विद्यार्थ्यांना बाहेर बसविले होते.

याबात ‘सकाळ’ने ता. १६ जुलै रोजीच्या अंकात ‘महान येथील ५७ वर्ष जुनी मराठी शाळेची भिंत पडली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाचे डोळे उघडले. आणि गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी पडलेल्या शाळेची पाहणी केली. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांनी महान पाटबंधारे विभागाशी त्याच जागेवर नवीन इमारत बांधण्याची परवानगी मागितली असता, नवीन इमारत बांधकामासाठी पाटबंधारे विभागाने परवानगी दिली असल्याचे मुख्याध्यापिका देशमुख यांनी सांगितले.

शाळेच्या इमारतीचे काम सर्वशिक्षा अभियान अंतर्गत करण्यात येणार आहे. तोपर्यंत शाळेच्या आवारात एक टिनाची खोली तात्पुरती बांधून त्यामध्ये मुलांना शिकविण्यात येणार आहे.

शाळेची इमारत खूप शिकस्त झाल्याने शाळेच्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसविणे थोक्याचे असल्याने. याच ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी पाटबंधारे विभागाने परवानगी दिली आहे.

- शाहिद खान सरफराज खान, केंद्र प्रमुख, महान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या आक्षेपामुळे ऐन तारुण्यात गमावलेलं मंत्रिपद, आज त्याच भाजपनं मुख्यमंत्री बनवलं; कोण आहेत सम्राट चौधरी?

सायबर फसवणुकीचा नवा फंडा, दहशतवाद्यांशी संबंध असल्याची भीती दाखवून महिलेला घातला 73 लाखाचा गंडा

सतत बायकोसोबत रिल्समध्येच दिसतो... अपूर्वा नेमळेकरचा पती करतो तरी काय? अभिनेत्री म्हणाली- तो...

नजरेत आग आणि चेहऱ्यावर तोच करारीपणा ! नामदेव ढसाळांच्या भूमिकेत ललित प्रभाकर ; या तारखेला रिलीज होणार सिनेमा

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

SCROLL FOR NEXT