Akola Toll free number also used for minor works sakal
अकोला

अकाेला : टोलफ्री क्रमांक ठरला पोलिसांसाठी डोकेदुखी

किरकोळ कामांसाठीपण होतोय वापर

सकाळ वृत्तसेवा

रिसोड : पोलीस विभागाने जारी केलेला ११२ टोल फ्री क्रमांक जनतेसाठी अत्यंत प्रभावी ठरत असून ११२ क्रमांक डायल करताच पोलीस काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. त्यामुळे समाजात पसरणाऱ्या गुन्हेगारी घटनांना कुठेतरी आळा बसत आहे. मात्र काही ठिकाणी किरकोळ कामासाठी याचा वापर होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

कळत-नकळत अशी काही कामे जि तातडीची नाही, तरीही ११२ वर फोन करून पोलिसांना बोलावले जाते. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतात मात्र हे काम तातडीचे नव्हते हे कळल्यावर डोकेदुखी ठरते.अशीच घटना रिसोड शहरात समोर आली आहे. २५ मे रोजी रात्री ११:०० वाजता एका व्यक्तीने ११२ वर कॉल केला आणि एकूण ४ पोलीस ११२ वर कॉल करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. चौकशी केली असता त्या व्यक्तीचा मोबाईल हरवल्याचे आढळून आले. पण ११२ वर फोन करून अशा कामासाठी बोलावणे हे देखील एक प्रकारे बेजबाबदार कृत्य ठरू शकते. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे फोन करणारा शिक्षक आहे.

शिक्षकाने दुसऱ्या दिवशी मोबाईल हरवल्याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली. त्याची तक्रारही पोलिसांनी नोंदवली. मात्र यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला, ११२ वर कॉल करून लोक जागरूक होत असतानाच कुठेतरी चुकीचा फायदाही घेतला जात आहे, अशा परिस्थितीत ११२ वर कॉल संबंधीत जनजागृती करणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्या प्रकरणात पोलिसांची मदत कधी आणि कशी घ्यावी हे लोकांना कळू शकेल.

११२ वर कॉल करून नाहक त्रास दिल्याचे अनेक प्रकरणातून पोलिसांच्या निदर्शनास आले. अशा प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईही केली आहे. अशा लोकांवर कडक कारवाई करून त्यांना धडाही शिकवला जात आहे.अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच ११२ वर कॉल करा.पोलीस विभाग सदैव सतर्क आहे.

-देवेंद्रसिंह ठाकूर, ठाणेदार, रिसोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT