Akola water supply bjp devendra fadnavis jal aakrosh movement  sakal
अकोला

एक आक्रोश अकोल्यातील पाण्यासाठीही होऊन जाऊ द्या!

भाजपच्या सत्तेत दोनवेळा दररोज पाण्याची घोषणा; अंमलबजावणी मात्र नाही

मनोज भिवगडे

अकोला : भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री व राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात औरंगाबाद येथील पाण्याच्या प्रश्नावरून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच भाजपने अकोला महानगरपालिकेत पाच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतरही अकोलेकरांनी नियमित पाणी मिळू शकले नाही. दोन-दोन वेळा भाजपच्या महापौरांनी दररोज पाणी देण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे फडणवीस साहेब अकोल्यातील पाण्यासाठीही एक जलआक्रोश होऊन जाऊच द्या, अशी मागणी अकोलेकरांकडून होऊ लागली आहे.

अकोला शहरात सध्या काही भागात चौथ्या दिवशी तर काही भागात आठवड्यातून एकच दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, २५० कोटीच्या वर खर्च करून अमृत योजनेतून अकोला शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्यात. महान येथील काटेपूर्णा प्रकल्पावर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रापासून ते अकोला शहरापर्यंत नवीन जलवाहिनीही टाकण्यात आली. ही कामे सुरू असताना तत्कालीन अकोला महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या वतीने अकोलेकरांना दररोज पाणी दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पाच वर्षांत अकोल्यातील अमृत योजनेचं कामच १०० टक्के झाले नसल्याचा आरोप मनपातील विरोधी पक्षांनी केला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून राण उठविणाऱ्या भाजपने अकोलेकरांनाही नियमित पाणी मिळावे यासाठी एक जलआक्रोश मोर्चा काढावा, अशी मागणी होत आहे.

महापौरांची घोषणा विरली हवेत !

भाजपच्या महापौर अर्चना जयंत मसने यांनी अमृत योजनेतून कामे झाल्याचा दाव करीत दोन वेळा महानगरपालिका प्रशासनाला अकोला शहरात दररोज पाणी देण्याबाबत निर्देशित केले होते. नागरिकांनीही महिनाभरात दररोज पाणी मिळेल, असे आश्वासन दिले. मात्र, दोन्ही वेळा ही घोषणा हवेतच विरली.

प्रशासक नियुक्तीनंतरही पाण्याचा प्रश्न कायम

अकोला महानगरपालिकेतील भाजपची पाच वर्षांची सत्ता संपल्यानंतरही अमृत योजनेंतर्गत अकोलेकरांना दररोज पाणी मिळाले नाही. आता प्रशासक नियुक्तीनंतर तरी पाण्याचे निट नियोजन होऊन अकोलेकरांना दररोज पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाच्या काळत तर नियोजित वेळापत्रकानुसारही पाणीपुरवठा होत नसल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारतीय जनता पक्ष पाच वर्षे अकोला महानगरपालिकेत सत्तेत असताना २५० कोटी रुपये खर्च करून अमृत योजना राबविण्यात आली. त्यातून अकोल्यातील चांगल्या जलवाहिन्या बदलण्यात आल्यात. नवीन जलवाहिन्या व नवीन जलकुंभ उभारल्यानंतर दररोज पाणी मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, २५० कोटी खर्च करण्यापूर्वीही चार दिवसांनंतर पाणी मिळत होते आणि आताही चार दिवसानंतरच पाणी मिळत आहे. त्यामुळे ही २५० कोटी रुपये नागरिकांच्या सोयीसाठी खर्च केले की कंत्राटदाराचे तिजोरी भरण्यासाठी योजना राबविण्यात आली, याचे स्पष्टीकरण भाजप देणार आहे का?

- डॉ. झिशान हुसेन (काँग्रेस), माजी विरोधी पक्ष नेता, महानगरपालिका

औरंगाबादमध्ये जलआक्रोश करणारे माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अकोलेकरांसाठी जलआक्रोश कधी करणार आहेत. नागपूरपेक्षा अकोला त्यांना जवळ पडते. येथे त्यांच्या पक्षाची पाच वर्षे सत्ता होती. ते अकोलेकरांसाठी जलआक्रोश करू शकत नसेल तर त्याना व भाजपला अकोलेकरांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल.

- नीलेश देव, नेते, वंचित बहुजन आघाडी

अकोला नगरपालिका असताना अकोलेकरांना दररोज पाणी मिळत होते. महानगरपालिका झाल्यानंतर व भाजप सत्तेत आल्यापासून धरणात १०० टक्के जलसाठा असल्यानंतरही आठवड्यातून एक दिवस व तोही नियमित पाणीपुरवठा होत नाही. भाजपचे नियोजन नाही. प्रशासक नियुक्तीनंतरही त्यात कोणतीच सुधारणा झाली नाही. भाजपने एक आंदोलन पाण्यासाठी अकोल्यात करावे. शिवसेना प्रसंगी अकोलेकरांसाठी रस्त्यावर उतरण्यासही तयार आहे.

- अतुल पवणीकर, शहर प्रमुख (पूर्व), शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT