Shirdi Nilwande Dam esakal
अकोला

Shirdi Nilwande Dam: तीन दिवसांच्या आत निळवंडे कालव्याची चाचणी बंद; 'हे' मोठं कारण आलं समोर

गळतीमुळे निळवंडे कालव्याची चाचणी बंद

सकाळ डिजिटल टीम

Shirdi Nilwande Dam: त्रेपन्न वर्षे रेंगाळलेल्या निळवंडे प्रकल्पातून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडलेले पाणी अवघ्या त्रेपन्न तासात बंद करावे लागले. शेतांत आणि घरांत पाणी जाऊ लागल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जाण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली.

आमदार किरण लहामटे यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांची बाजू घेत अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर चाचणी बंद करण्यात आली. आता या भागात सातशे मीटर अंतरात प्लॅस्टिकचा कागद अंथरूण पुन्हा चाचणी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Akole Nilwande Dam Water leakage test of Nilwande canal stopped )

धरणाच्या भिंतीपासून पहिल्या सात किलोमीटर अंतरातील मेहेंदुरी गावाजवळ डाव्या कालव्याला न थांबणारी गळती लागल्याने ही चाचणी बंद करण्याची नामुष्की ओढवली. गळतीमुळे अकोले तालुक्यातील शेतकरी संतापले तर पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहणारे लाभक्षेत्रातील दुष्काळी टापूतील शेतकरी हिरमुसले.

या भागात कालवा जमीन सपाटीपासून तब्बल चाळीस फूट उंच आहे. स्फोटकांच्या साहाय्याने डोंगर खोदून तो तयार करण्यात आला. त्यामुळे डोंगराच्या पोटात खोल भेगा पडल्या आहेत. कालव्यात सोडलेले हे पाणी या भेगांतून थेट सुमारे चाळीस फूट खाली असलेल्या शेतात आणि घरात जाऊ लागले.

काल काही ठिकाणी कालव्याच्या पात्रात काळी माती टाकून हा पाझर थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. ही गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी संतापले. आमचा कालव्यात पाणी सोडण्यास विरोध नाही. मात्र घरात आणि शेतात पाणी जाऊन नुकसान होणार असेल ते आम्ही कसे सहन करायचे असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

तेवढ्यात आमदार लहामटे तेथे आले. त्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने अखेर दुपारी दोनच्या सुमारास चाचणी बंद करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. आता या सातशे मिटर लांबीच्या गळतीच्या अंतरात कालव्याच्या पात्रात प्लॅस्टिक कागद अंथरून चाचणी पुन्हा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मात्र डाव्या कालव्याच्या पंधरा ते सतरा आणि एकवीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरात देखील अशीच स्थिती आहे. त्यामुळे चाचणीच्या वेळी तेथील काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांना रोज 550 कोटींचा तोटा! सरकारच्या दाव्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

Marital Dispute: पत्नीच्या प्रेमसंबंधातून धर्मांतराचा कट? पत्नीच्या वागण्यात बदल झाल्याचा पतीचा दावा, मुंबईतील बँकेकडे मोठी मागणी

Panhala Accident News : नातीचा चेहरा पाहून परतणाऱ्या आजीवर काळाचा घाला, पन्हाळ्यातील घटनेने हळहळ

SRH vs RR, Eliminator: "नेट्समध्ये वैभवला मी...", जोफ्रा आर्चरचे १५ वर्षांच्या सूर्यवंशीला आऊट करण्याबद्दल भन्नाट उत्तर; VIDEO

SCROLL FOR NEXT