अकोला

ऑक्सिजन सिलिंडर भरण्याची यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न

पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथील ओझोन वायु प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करुन त्याची अकोला जिल्ह्यात सध्याच्या आपत्तीच्या काळात उपलब्धता करता येते का? याबाबतच्या शक्यतेसंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रास भेट दिली.

यावेळी त्यांचे समवेत महानिर्मिती पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता खराटे व उप मुख्य अभियंता दामोदर तसेच बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी उपस्थित होते. औष्णिक विद्युत निर्मिती करतांना आवश्यक असणाऱ्या ओझोन वायुच्या उपलब्धतेसाठी येथे ऑक्सइजन निर्मिती केली जाते. त्यासाठी पारस येथे दोन संयंत्रे आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा ऑक्सिजन हा ओझोन प्रक्रियेसाठी वापरला जात असल्याने निर्माण होणारा ऑक्सिजन हा सिलिंडरमध्ये भरण्याची व्यवस्था येथे नाही.

त्यासाठी आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री येथे उभारल्यास येथून ५०० सिलिंडर इतका ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला. याठिकाणी सिलिंडर्स भरता यावे यासाठी संयंत्रे उभारण्याबाबत पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे, महाजेनको व शासनस्तरावर पाठपुरावा करुन प्रयत्न सुरू आहेत. पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्य देऊन पाठपुरावा करावा,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. त्यासाठी जिल्हाप्रशासनही प्रयत्न करीत आहे,असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी स्पष्ट केले.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT