अकोला

धक्कादायक, सिझर करताना पोटात राहिली बँडेजची पट्टी

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : गरोदर महिलेचं सिझर करत असताना डॉक्टराकडून बँडेज पट्टी पोटात राहिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बुलडाण्यात (buldhana) घडली आहे. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळेच महिलेला मृत्यू झाला असून डॉक्टरावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. (bandage left in abdomen during caesarean death of woman in buldhana)

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील महिला गरोदर होती. 7 एप्रिल रोजी प्रसूती कळा जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी सिझर केले. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

पण सिझर झाल्यानंतर तिच्या पोटात अचानक दुखायला लागले. पाच दिवस ती रुग्णालयातच होती. पण पोट दुखणे काही थांबले नाही. पोट दुखणे थांबत नसल्यामुळे महिलेला पुढील उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले होते. 19 तारखेला महिलेवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातून तिला सुट्टी देण्यात आली आणि ती घरी आली. पण, पुन्हा पोटात दुखायला लागले.

त्यामुळे महिलेच्या पतीने 10 जून रोजी खामगाव येथील खासगी रुग्णालयात पत्नीला रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी करून तपासणी केली असता पोटात बँडेजची पट्टी असल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करून पोटातील बँडेज बाहेर काढण्यात आली. शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा महिलेचा त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे पुन्ह बुलडाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

प्रसुतीदरम्यान, बँडेज पोटात राहिल्यामुळेच पूजाचा मृत्यू झाला असा आरोप करत हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे, असं वृत्त स्थानिक दैनिकाने दिले आहे.

(bandage left in abdomen during caesarean death of woman in buldhana

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT