अकोला

नेता असावा तर असा! वेशांतर करुन गुटखा विक्रेत्यांवर बच्चू कडूंची धाड

मनोज भिवगडे

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Guardian Minister Bachchu Kadu) हे अनोख्या आंदोलनांसाठी ओळखले जातात. राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतरही त्यांच्या कार्यशैलीत कोणताही बदल झालेला नाही. सोमवारी वेशांतर करून पालकमंत्र्यांनी अकोला शहर व पातूर येथील विविध शासकीय कार्यालयांची झाडाझडती (Inspection of various government offices) घेतली. स्वस्त धान्य दुकानांची पाहणी केली तर बँकेतही पाहणी केली. विशेष म्हणजे, त्यांनी गुटखा विक्रेत्यांवर धाड (Raid on gutkha sellers) टाकून त्यांचा माल जप्त करीत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. (Bribe-given-by-Guardian-Minister-Bachchu-Kadu-for-picker-loan)

अकोला जिल्ह्यातील कारभाराचा जवळून अनुभव घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी कोणताही शासकीय दौरा जाहीर न करता जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्यात. शासकीय यंत्रणा, बँका कशा काम करतात, नागरिकांना त्याचा कोणता त्रास होते, हे जवळून अनुभवण्याच्या उद्देशाने त्यांनी वेशांतर करीत कोणताही ताफा सोबत न घेता मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अकोला व पातूर या ठिकाणी भेटी दिल्यात.

त्यांनी महानगरपालिकेपासून सुरुवात केली. महानगरपालिकेत झाडाझडती घेतल्यानंतर अकोल्यातील एका दुकानावरून गुटखा विकत घेतला. त्यानंतर त्यांचा मोर्चा पातूर येथे पोहोचला. तेथे त्यांनी विदर्भ कोंकण बँकेत जाऊन कर्जाबाबत अर्ज भरून घेण्यास सांगितले. तातडीने अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांना पैसेही देऊ केले. मात्र, बँकेच्या व्यवस्थापकांनी प्रामाणिकपणे रीतसर अर्ज करण्यास सांगितले.

त्यानंतर पातूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात त्यांचा ताफा पोहोचला. तेथे त्यांनी तातडीने रेशन कार्ड बनविण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केली. अधिकाऱ्यांनी रीतसर अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर दोन स्वस्त धान्य दुकानांची त्यांनी पाहणी केली. मात्र, तेथेही त्यांना प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला. ऑनलाइन वितरण असल्याने कुणालाही धान्य देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. कृषी सेवा केंद्रावर जाऊन बियाणे वितरणाची व्यवस्था त्यांनी बघितली. त्यानंतर त्यांनी पातूर येथील एका किराणा दुकानात धाड टाकून तेथे गुटखा जप्त केला. पोलिसांना बोलावून रीतसर कारवाई करीत विक्रेत्यावर स्वतः बसून गुन्हा दाखल करून घेतला.

पोलिस, अन्न औषध प्रशासनावर हप्तेखोरीचा आरोप

पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे करणारे, गुटखा विक्रेता यांची झाडाझडती घेतली. त्यात विक्रेत्यांनी अन्न औषध प्रशासन व पोलिसांना हप्ते पुरविले जात असल्याची माहिती पालकमंत्र्यांना दिली. दोन्ही विभागांवर गुटखा विक्रीला प्रतिबंध करण्याची जबाबदारी असताना त्यांच्याकडून हप्ते खाण्याचे काम सुरू असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोपही पालकमंत्र्यांनी केला.

जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, पुरवठा विभाग, स्वस्त धान्य दुकाने, कृषी सेवा केंद्र, बँकेत वेशांतर करून पाहणी केली. काही ठिकाणी प्रामाणिकपणे काम सुरू असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी अवैध मार्गाने कामे सुरू असल्याचे दिसून आले. अन्न व औषध प्रशासन, पोलिस हप्तेखोरीत विलिप्त झाले आहेत. त्यांचा कोणताही अंकुश राहिला नाही. याबाबत दोन्ही विभागाच्या प्रमुखांना जाब विचारणार आहे.
- बच्चू कडू, पालकमंत्री, अकोला

(Bribe-given-by-Guardian-Minister-Bachchu-Kadu-for-picker-loan)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT