three people died in road accident at Buldana three people died in road accident at Buldana
अकोला

नवरदेव व सख्या भावासह मित्राचा मृत्यू; विसपुते कुटुंबावर काळाचा घाला

सकाळ डिजिटल टीम

मेहकर (जि. बुलडाणा) : मोठ्या भावाचे लग्न असल्यामुळे विसपुते कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. महिनाभरावर लग्न असल्यामुळे विसपुते कुटुंब बस्ता आणि साखरपुडा उरकण्यासाठी निघाले होते. मात्र, काळाला दुसरेच मान्य होते. आयुष्यातील सर्वांत सुखद क्षणाची पहिली पायरी चढण्याआधीच काळाने घाला घातला. एकाच दिवशी एकाच ठिकाणी मोठ्या व मधल्या भावांचा मृत्यू (Died Road) झाल्याचे ऐकून कुटुंबासह गावकरी हादरले. (three people died in road accident at Buldana)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश विनायक विसपुते (३५) यांचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील मुलीशी ठरला होता. हा विवाह सोहळा १८ मे रोजी होणार होता. यामुळे विसपुते कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. शनिवारी पहाटे विसपुते कुटुंब कारने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून मित्र आणि नातेवाइकांना घेऊन साखरपुड्यासाठी जात होते. मात्र, मेहकर नजीक त्यांचे वाहन पोहोचले असता काळाने घाला घातला.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथून जाणाऱ्या औरंगाबाद ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खामखेड फाटानजीक खाजगी ट्रॅव्हल्स आणि त्यांच्या कारमध्ये भीषण अपघात (Road accident) झाला. समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात योगेश विनायक विसपुते (३५), विलास विनायक विसपुते (३२) व इंदल चव्हाण (३८) या तिघांचा मृत्यू (Three Died) झाला. तर मिथून रमेश चव्हाण व ज्ञानेश्‍वर रंगनाथ चव्हाण हे गंभीर जखमी झाले. जखमींवर प्रथम उपजिल्हा रुग्णालय व नंतर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आला. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला.

कुटुंबाला बसला जबर धक्का

एकाच कुटुंबातील दोन कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे आई व सर्वांत लहान भाऊ नीलेश विसपुते यांना जबर धक्का बसला आहे. दोघे भाऊ व गाडीतील इतर तिघे हे चाळीसगाव येथील पाटील पेट्रोलपंपावर काम करीत होते. अपघाताची माहिती मिळताच सर्वत्र शोककळा पसरली. नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात आक्रोश करीत होते. मृतांचे स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी लक्झरी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT