In Buldana district 885 infected corona patients have been found and three have died  
अकोला

जिल्ह्यात बाधिताचा विक्रमी आकडा; ८८५ पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : कोरोना बाधिताची संख्या जिल्ह्यात वाढतच असून, उपाययोजना कमी पडत असल्यामुळे हा प्रसार रोखण्यासाठी तत्काळ कडक लॉकडाऊन प्रशासन उचलणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गुरुवारी (ता. १८) ८८५ बाधित रुग्ण आढळले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. 

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६०९६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ५१९३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ८८५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४३५ व रॅपिड टेस्टमधील ४५० अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ६५५ तर रॅपिड टेस्टमधील ४५३८ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ५१९३ अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ४४६० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २२९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
 
पॉझिटिव्ह आलेले अहवाल 

बुलडाणा शहर व तालुका : ११९, खामगाव शहर व तालुका : १२९, शेगाव शहर व तालुका : ३१, देऊळगाव राजा तालुका व शहर : ८५, चिखली शहर व तालुका : ५१, मेहकर शहर व तालुका : १०, मलकापूर शहर व तालुका : १२४, नांदुरा शहर व तालुका : ८५, लोणार शहर व तालुका : २६, मोताळा शहर व तालुका : ३२, जळगाव जामोद शहर व तालुका : ८७, सिंदखेड राजा शहर व तालुका : ९२ आणि संग्रामपूर शहर व तालुका : १४ संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT