Guatam Buddha sakal
अकोला

बुलढाणा : भोन येथील बुद्ध स्तूपाचे होणार उत्खनन

सकाळ वृत्तसेवा

बुलढाणा : जिल्ह्यात प्राचीन भारतीय संस्कृतीचा तब्बल २३०० वर्ष जुना इतिहास सांगणारा भला मोठा ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. यात सम्राट अशोक कालीन इसवीसन पूर्व ३०० ते इसवीसन पूर्व १०० वर्ष जुना एक बुद्ध स्तूप आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा जागतिक पटलावर उमटणार आहे. या ठिकाणी होत असलेल्या जिगाव प्रकल्प क्षेत्रात भोन हे गाव बुडीत क्षेत्रात जात असल्याने तब्बल १३५ हेक्टर जमीन संरक्षित भिंत बांधून या स्तूपाचे जतन करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. १ ऑक्टोबरला जलसंपदा विभागाने नाशिक पुरातत्त्व विभागाची तत्त्वतः मान्यता मिळवली आहे.

दोन दशकापासून या स्तुपासाठी झटणाऱ्या भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ मेश्राम, सचिव प्रा. प्रफुल खंडारे इत्यादींनी कार्यकारी अभियंता जिगाव जलसिंचन धरण प्रकल्प श्रीराम हजारे यांची भेट घेऊन त्यांचा व त्यांचे सहकारी सहायक अभियंता पी. एस. जुनेजा यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संग्रामपूर तालुक्यातील या भोन गावात २००२ साली पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाच्या डॉ. भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वात झालेल्या उत्खननात हा बुद्ध स्तूप आढळून आला आहे.

या संशोधनात स्तुपाचा पूर्ण रूपातील प्रदक्षिणा मार्ग सापडला आहे. सोबतच त्याकाळच्या परंपरेच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे देखील आढळून आले आहेत. यामध्ये तत्कालीन अनेक विहिरी, नाणी, मृण्मयी अलंकार, धान्य इत्यादी सारख्या महत्वपूर्ण बाबी आढळल्या आहेत. यामुळे या परिसराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरत होती.

२००२ साली सुरू झालेल्या प्राथमिक ५ वर्षातील उत्खननात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र सरकारी अनास्थेमुळे हा स्तूप पुन्हा एकदा जमिनीखाली दडवून ठेवण्याची दुर्दैवी वेळ या डेक्कन कॉलेजच्या संशोधकांवर आली. त्यामुळे ज्यांच्या शेतात हा स्तूप आहे. हे अजूनही या जागेवर पीक घेत आहेत. मात्र, या स्तुपाचे उत्खनन व्हावे व भारताचा प्राचीन इतिहास जगासमोर यावा, अशी भावना या शेत मालकांनी सुद्धा बोलून दाखवली आहे.

खर्चाच्या प्रशासकीय मान्यतेची गरज

प्राचीन भारताचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकार पुढे आले अहे. त्यासाठी पुरातत्त्व विभागाची तत्त्वता मान्यताही मिळवली आहे. आता जल संपदा विभागाकडून खर्चाच्या प्रशासकीय मान्यतेची गरज असून, तीसुद्धा लवकर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT