बुलढाणा: मुद्रांक खरेदीकरिता नागरिकांची केलेली प्रचंड गर्दी... 
अकोला

बुलढाण्यात झुंबड; चिखली येथे मुद्रांक खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी

सकाळ वृत्तसेवा

चिखली (जि.बुलढाणा): तालुक्यात मुद्रांकचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मुद्रांक खरेदीसाठी ज्या मुद्रांक विक्रेत्यांकडे स्टॅम्प उपलब्ध आहेत त्यांच्या दुकानासमोर दि.03 जून रोजी सकाळपासूनच लोकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र जुन्या तहसील आवारातील मुद्रांक विक्रेत्यांकडे दिसून आल्याने कोरोनाचे नियमांचा फज्जा उडाला आहे. तरी या ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून बेजबाबदार गर्दीमुळे कोरोनासारख्या आजाराला खुलेआम आमंत्रण दिले जात आहे. (Buldhana Citizens repent for buying stamps at Chikhali)


सध्या पीक कर्जासाठी शेतकरी बँकेत जाते आहेत. पीक कर्जासाठी बँकांमध्ये 100 रुपयांच्या मुद्रांकाची मागणी केली जात आहे. मात्र वेळेत मुद्रांक मिळत नसल्याने शेतकर्‍यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामीण भागातून शेतकरी मुद्रांक मिळावा म्हणून जुने तहसील कार्यालयात येत आहेत. त्यामुळे मुंद्राक विक्रेत्यांसमोर मोठी गर्दी होत असून जादा 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी 110 रुपये द्यावे लागत आहेत. तरीही मुद्रांक मिळत नसल्याचे चित्र आहे.


कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातून सावरण्यासाठी पीककर्ज काढले जात आहे. यासाठी अनेक बँकाही पुढे आल्या आहेत. कर्ज प्रकरणासाठी 100 रुपयांचे मुद्रांक आवश्यक असते. कर्जाच्या प्रमाणात बँकेचे व्यवस्थापक शेतकर्‍यांना मुद्रांक आणण्यासाठी सांगतात. मात्र, केवळ मुद्रांक वेळेत न मिळाल्याने शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. स्टॅम्प घेण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने मुद्रांक विक्रेते देखील वैतागले आहेत. सध्या पीककर्ज, वीज कनेक्शन, घरकुल, संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्पची मोठी मागणी आहे.

संपादन - विवेक मेतकर

Buldhana Citizens repent for buying stamps at Chikhali

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT