The burnt body of his wife along with the retired Deputy Collector was found akola marathi news 
अकोला

सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांच्यासह पत्नीचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

अकोला  : खदान पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आझाद कॉलनीच्या बाजूला असलेल्या बळवंत कॉलनी येथे भगत दांपत्याचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले .ही घटना शुक्रवारी (ता.5) सकाळी उघडकीस आली. ही माहिती खदान पोलिसांना मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. ही घटना कशामुळे घडली आणि यामागे काय कारण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

मृतक सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी
अकोला शहरातील बळवंत कॉलनी परिसरात आज पहाटेच्या सुमारास वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतक भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असून मृत्युचे कारण नेमकं कळू शकले नाही. अधिक तपास खदान पोलिस करतायत.

बंगल्यात नव्हते दुसरे कोणीच
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह आढळलेल्या सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भगत यांच्या बंगल्यात त्यांच्या पत्नीसह दुसरे कोणीही कुटुंबीय राहत नव्हते . घरात आग लागून जीव गुदल्यामुळे मृत्यू झाला झाला की ही आत्महत्या आहे हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT