अकोला

'प्रेतांची यात्रा' पाहून स्मशानभूमीचंही काळीज धडधडायला लागतं

धीरज बजाज

हिवरखेड (जि.अकोला) हे माणसा ! सर्व प्राणीमात्रांमध्ये तू सर्वात हुशार प्राणी म्हणून समजला जातो.. तुला भावना व्यक्त करता येतात.. भूक तहान लागली की तुला सांगता येते.. तू सर्व ईच्छा पूर्ण करू शकतोस.. मात्र कोरोनाचं आक्रमण परतवून लावण्यास असमर्थ ठरतोय.. दवाखान्यात उपचार घेण्यासाठी धडपड करावी लागते..

याचना करावी लागते.. पैसा असून सर्वकाही शून्य.. आज तुझी केविलवाणी अवस्था पाहून वेदना होतात.. होय, मी स्मशानभूमी बोलतेय.. कोरोनामुळे मृत्युदर वाढला आहे.. पूर्वी प्रेतयात्रा काढली जायची.. आता 'प्रेतांची यात्रा' पाहून काळीज धडधडायला लागतं.. कोरोनामुळे मरण आलेल्या मृत माणसांना थेट दवाखान्यातून माझ्याकडे आणले जाते.. अंत्यसंस्कार करण्यासाठी.. अरे,अंत्यसंस्कार कुठले ?

तुझं शरीर जाळण्यासाठी.. जीवंतपणी तू अनेकवेळा रांग अनुभवली असेल.. मेल्यावरही तुला रांगेत पाहून खरंच जीव कासावीस होतो.. तुझ्या आप्तेष्टांच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा पाहून मन गहिवरून येतं.. बाहेरून घरी आल्यावर तुला बिलगणारी मुलं तुझा चेहरा सुद्धा पाहू शकत नाही.. शब्द नाही रे व्यक्त होण्यासाठी.. परंतु आज मन मोकळं करावसं वाटतय.. खरंच किती विचित्र..

किती भयावह परिस्थिती ! कोरोनाच्या नावानं चांगभलं, म्हणत तुझ्या पैकी काहीजण लुटमार करताहेत.. साठमारी केली जाते.. जो तो प्रेतांच्या अग्नी ज्वालांवर पोळी शेकण्याचा प्रयत्न करतोय.. कुठल्याच बाबतीत गांभीर्य नाही.. पुढारी लोकं टीका टिप्पणीचा खेळ खेळन्यात रमली आहे.. यात चांगल्या माणसाचं मरण होतंय.. आणि मरणानंतरही त्याला यातना सहन कराव्या लागत आहे.. प्रेतांचा सडा पाहून माझे अश्रूही आटले आहे..अरे माणसा आता तरी सावध हो.. जागा हो !!

सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

कोरोना विषाणूची दहशत वाढतच आहे. अनेक नागरिक गांभीर्याने घेत नाही. मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेहाच्या रांगा पाहायला मिळतात. या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी आवाहन केले जात आहे. सामाजिक विषयावर लिखाण करणारे सुनील आरेकर यांनी शब्दांकित केलेला ' होय, मी स्मशानभूमी बोलतेय ! ' हा हृदयस्पर्शी संदेश सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून समाजमनाला अंतर्मुख करायला लावणारा आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT