राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर अज्ञात व्यक्तीने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर अज्ञात व्यक्तीने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा
अकोला

माँ जिजाऊंच्या राजवाड्यासमोर उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजमाता माँ जिजाऊ (Mother Jijau) यांच्या राजवाड्यासमोर कुणीतरी ८ जानेवारीच्या मध्यरात्री अश्‍वारूढ असा १२ ते १४ फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा (Statue) उभारला आहे. ही बाब सकाळी अघडकीस आली. यानंतर प्रशासनाकडून पाहणी करून पुतळा कोणी बसवला याचा तपास सुरू झाला.

माँ साहेब जिजाऊ जन्मोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी जिजाऊ जन्मोत्सव ऑनलाइन होणार आहे. अशात कोणीतरी परवानगी न घेता अश्‍वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यामुळे काय करावे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) त्या ठिकाणी ठेवायचा की इतरत्र हलवायचा या संदर्भामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी पाच वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुणी पुतळा बसविला या संदर्भात पोलिस विभागाकडून तपास सुरू आहे.

सोशल मीडियावर जल्लोष

राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा बसविल्यानंतर सोशल मीडियावर जल्लोष पाहायला मिळत आहे. अनेक व्यक्तींच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो व व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

अज्ञात व्यक्तीने राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर ८ जानेवारीच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) उभा केला. सकाळी अश्‍वारूढ पुतळ्याची पाहणी नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली. पुतळा बसविण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध नगरपरिषदेकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : सत्तेसाठी टोकाचे राजकारण; विरोधकांचा पत्ता कापण्यासाठी अनधिकृत बांधकाम ठरणार हत्यार

IPL 2026: सॅमसनमुळे ऋतुराजचे सलामीचे स्थान गेले...! अश्विनने निवडलेल्या CSK च्या प्लेइंग १२ मध्ये दिसेल नवीन ओपनिंग जोडी

VIDEO: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबईतील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल

Lionel Messi India Tour : 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी लिओनेल मेस्सीला किती कोटी रुपये मिळाले? पोलिस तपासात आयोजकाचा खुलासा

Latest Marathi News Live Update : मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकात बैठक सुरू

SCROLL FOR NEXT