akola collector sakal media
अकोला

नागरिकांनी ‘दुसरा डोस’ प्राधान्याने घ्यावा; जिल्हाधिकारी निमा अरोरा

ओमायक्रॉनचा फैलाव लक्षात घेता लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : ओमायक्रॉनचा (omicron)फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाचे(vaccination) दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. दुसरा डोसचा कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांनी प्राधान्याने मुदतीत लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरोरा (collector nima arora) यांनी केले आहे. जिल्ह्यात १४ लक्ष ३३ हजार लाभार्थ्यांना (१८ वर्षे वयावरील) लस देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पहिला डोस आतापर्यंत १० लक्ष ९५ हजार ३२० नागरिकांनी म्हणजेच ७६.४४ टक्के लोकांनी घेतला आहे, तर ५ लक्ष ५६ हजार ६६१ व्यक्तींनी म्हणजेच ३८.८५ टक्के लोकांनी दुसरा डोस(second dose) घेतला आहे, अशी माहिती लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. मनीष शर्मा(dr. manish sharma) यांनी दिली आहे.

८० टक्के लसीकरण झाल्यास ओमायक्रॉनचा धोका कमी

ओमायक्रॉनचा फैलाव लक्षात घेता लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या ८० टक्के झाल्यास ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका कमी असेल. ज्या व्यक्तींना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले त्या व्यक्तींचे लसीकरण झालेले नव्हते, अशी त्यांची वैद्यकीय पार्श्वभूमी सांगते, त्यामुळे लसीकरण झाल्यास संभाव्य तिसरी लाट आपण थोपवू शकतो, असेही डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.

१०० ठिकाणी लसीकरणाची सुविधा

जिल्ह्यात १०० ठिकाणी लसीकरण सुविधा उपलब्ध राहणार असून त्यात प्राधान्याने दुसरा डोसकरिता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे कोविडच्या लसींची मात्राही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहितीही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Bacchu Kadu : निष्ठा मायबापावर ठेवा, नेता व त्यांच्या पक्षावर नाही!

Latest Marathi News Live Update: मुंबईत तीन दिवस पाणी कपातीचे संकट

SCROLL FOR NEXT