अकोला ः कोरोना विषाणू संसर्गग्रस्त ४२५ नवे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यासोबतच १६ रुग्णांचा मृत्यू झाला. ४७७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. त्यामुळे सद्या जिल्ह्यात ६५९५ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. Corona cases drop in Akola district, death rate remains high!
कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १८) जिल्ह्यात १ हजार ९१४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ६३२ अहवाल निगेटिव्ह तर २८२ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत १४३ नवे रुग्ण आढळल्याने ४२५ नवे रुग्ण आढळले.
त्यात ११७ महिला व १६५ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर येथील ११, अकोट-१०, बाळापूर-५५, तेल्हारा-०१, बार्शीटाकळी-२१, पातूर-२९, अकोला ग्रामीण मधील २९, अकोला मनपा क्षेत्रातील १२६ रुग्णांचा समावेश आहे.
असे आहेत कोरोनाचे बळी
खानापूर वेस ता. अकोट येथील ३२ वर्षीय पुरुष, किनखेड येथील ७३ वर्षीय महिला, मूर्तिजापूर येथील ४८ वर्षीय पुरुष, दोनद बु. ता. बार्शीटाकळी येथील ४३ वर्षीय पुरुष, वाशिंबा बोरगाव मंजू येथील ६२ वर्षीय महिला, सांगवी जोंगदेव ता. बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष, कोलविहीर ता. अकोट येथील ४५ वर्षीय महिला, गणेश नगर, अकोला येथील ७५ वर्षीय पुरुष, पारंदा ता. बार्शीटाकळी येथील ८१ वर्षीय महिला, बाळापूर नाका अकोला येथील ४५ वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ६५ वर्षीय पुरुष, मूर्तिजापूर येथील ५२ वर्षीय पुरुष, पातूर येथील ६१ वर्षीय महिला, पुनोती ता. बार्शीटाकळी येथील ५८ वर्षीय महिला, गिरी नगर येथील ७६ वर्षीय महिला, अकोला खुर्द येथील ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५११५६
- मृत - ९४३
- डिस्चार्ज - ४३६१८
- ॲक्टिव्ह रुग्ण - ६५९५
संपादन - विवेक मेतकर
Corona cases drop in Akola district, death rate remains high!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.