अकोला

मनपाचे ३७ कोटीचे प्रस्ताव ‘बुडणार’!

निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला महाविकास आघाडीचा दणका

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिकेला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून २५ कोटी रुपायांचा निधी मिळाला होता. हा निधी महाविकास आघाडी सरकारने अकोट आणि बाळापूर नगरपालिकेकडे वळती करण्याचा आदेश ता. १३ सप्टेंबर रोजी दिला आहे. महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना महाविकास आघाडीने मनपातील सत्ताधारी भाजपला निधी वळता करून मोठा फटका दिला आहे. त्यामुळे राजकारणाच्या प्रवाहात महानगरपालिकेने सादर केलेले ३७ कोटी रुपयांचे प्रस्ताव ‘बुडणार’ आहेत.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना व अकोला महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप या एकेकाळच्या दोन मित्र पक्षांमध्ये सध्या हाडाचे वैर निर्माण झाले आहे. प्रत्येक पातळीवर शिवसेना व भाजप एकमेकांना अडचणीत आणण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून स्पष्ट होते. अकोला महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपलाही शिवसेनेच्या या राजकारणाचा पदोपदी सामना करावा लागत आहे. त्याचा प्रत्यय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून पुन्हा एकदा आला आहे.

जिल्हा वार्षिक योजना अनुसुचित जाती उपाययोजनेंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून सन २०२०-२१ या वर्षाकरिता अकोला महानगरपालिकेला २५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. हा निधी मनपाकडे वळताही करण्यात आला होता. त्यातून मनपाने ३७ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. समाजकल्याण विभागाकडून प्रस्तावांना मंजुरीही मिळाली होती. त्यामुळे या प्रस्तावित कामांना मनपा निवडणुकीपूर्वी सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मनपाकडून कामे सुरू करण्यासंदर्भात नियोजन सुरू असतानाच ता. १३ सप्टेंबर रोजी नगर विकास विभागाचे पत्र अकोला जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले. या पत्रातून मनपाला मिळालेल्या २५ कोटीच्या निधीचे पुनर्विनियोज करून हा निधी अकोट व बाळापूर नगर परिषदेकडे वळती करण्यात आला आहे.

अकोटला १४, बाळापूरला ११ कोटी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचा अकोला महानगरपालिकेचा वळती करण्यात आलेल्या निधीतून अकोट नगर परिषदेला १४ कोटी रुपये तर बाळापूर नगर परिषदेला ११ कोटी रुपये देण्यात आले आहे.

पालकमंत्री, आमदारांची भूमिका ठरली निर्णायक

अकोला महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला फटका देणारा निर्णय घेताना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू व बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांची भूमिका निर्णायक ठरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. पालकमंत्री प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अकोट विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करीत आहेत तर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या बाळापूर मतदार संघासाठी निधी पळविला असल्याची चर्चा आहे.

महानगरपालिकेला पालकमंत्र्यांनी २५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्‍यांनीच तो परत घेतला आहे.

- विजय अग्रवाल, माजी महापौर, अकोला

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून मनपाने ३७ कोटीचे प्रस्ताव सादर केले आहेत. मनपाला मिळालेल्या २५ कोटीचा निधी वळता केल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकृतपणे महानगरपालिकेला कोणतेही पत्र मिळाले नाही.

- अजय गुजर, कार्यकारी अभियंता, मनपा, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT