cowin registration; No mobile range; How to register in remote areas? file photo
अकोला

Cowin Registration; मोबाईल रेंज नाही; अतिदुर्गम भागात कशी होणार नोंदणी?

ग्रामीण भागातील नागरिकांच्या लसिकरणात अडचणी, लोकप्रतिनिधींची शासनाकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः ग्रामीण भागातील नागरिकांच्या लसिकरणाचा Vaccination प्रश्न निर्माण झाला आहे. लसिकरणाबाबतच्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नोंदणी करणाऱ्यांनाच लस दिली जात आहे. याबाबत ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्या दूर करण्याकरिता कार्यप्रणालीत बदल करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी शासनाकडे केली आहे. cowin registration; No mobile range; How to register in remote areas?

लसिकरणाचा पहिला व दुसरा डोस देण्याकरिता केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामध्ये नागरिकांना लाभ घेण्याकरिता नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्याशिवाय लसीकरण होणार नाही. ग्रामीण भागातील दुर्बल क्षेत्रातील अशिक्षित आणि गरीब नागरिकांमध्ये हीबाब चिंतेची ठरत आहे.

त्यामुळे शासनाबाबत असंतोषाचे वातावरण आहे. अकोला जिल्ह्यातील बहुतांशी भाग अतिदुर्गम क्षेत्र असून, ग्रामीण भागात गरीब, अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले नागरिक आहेत. त्यांच्याकडे लसिकरणाची समस्या निर्माण झाली आहे. डोंगराळ, अतिदुर्गम क्षेत्रात मोबाईल टॉवर नसल्यामुळे नेटवर्क मिळत नाही. ग्रामीण जनतेकडे अँड्रॉइड मोबाईल नसतात. असले तरी त्यांना नोंदणी करण्याचे ज्ञान नाही.

शासकीय व खासगी लसीकरण केंद्रावर सुद्धा नोंदणी करण्याची सुविधा नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. पात्र नागरिक लसिकरणापासून वंचित राहात आहेत, त्याचा गंभीर परिणाम कोविड-१९च्या तिसरा लाटेवर होऊ शकतो. याबाबत अकोला जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम व डोंगराळ प्रदेशातील गरीब, अशिक्षित जनतेच्या लसिकरणाच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना नियमांमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे.

ग्रामीण व डोंगराळ भागातील गरीब अशिक्षित नागरिकांना फक्त आधार कार्डावरच लसिकरण करण्यात यावे. त्याची एकत्रित नोंदणी करण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी आणि जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसिकरण करण्यात यावे, अशी आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे.

संपादन - विवेक मेतकर

cowin registration; No mobile range; How to register in remote areas?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT