Crime News sakal
अकोला

Crime News: पोलिसांची मोठी कारवाई, पाच लुटारुंना काही तासातच केले जेरबंद!

पेट्रोल पंप मालकास मारहाण करून अडीच लाखांची केली होती लुटमार ; तिघे अमरवतीत जेरबंद

प्रा.अविनाश बेलाडकर

Murtijapur News: येथील पेट्रोल पंप मालकास मारहाण करून तीन लाखांची लुटमार करणारे तिघे येथील शहर पोलीसांनी ८ तासात अमरावतीत जेरबंद केले.

तीन अज्ञात लुटारूंनी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नायरा पेट्रोल पंपाचे मालक दिनेश बुब यांना पेट्रोल पंपापासून २०० मिटर अंतरावर मारहाण करून त्यांच्याजवळची अडीच लाखाची रक्कम घेऊन काल रात्री साडे नऊच्या दरम्यान पोबारा केला होता. दिनेश बुब यांचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नायरा पेट्रोल पंप आहे. ते नेहमीप्रमाणे आपल्या चार चाकी वाहनातून पेट्रोल पंपावर झालेल्या विक्री ची रक्कम अडीच लाख रुपये घेऊन परत घराकडे जात होते. तिघा अज्ञात लुटारूंनी बुब यांच्या वाहनासमोर दुचाकी नेऊन त्यांना अडविले.

गाडी अडवून गाडीवर काठी मारून, दिनेश बूब यांच्या डोळ्यत मिरची पुड फेकून यांना खाली खेचले. त्यांच्या जवळील रोख रक्कम असलेली बॅग हिसकावली. बूब यांनी विरोध केला असता त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले व रोख रक्कम आसलेली बॅग घेऊन पसार झाले. त्यांना पेट्रोल पंपावर थांबून माहिती देणारा चौथा आरोपी माहिती देऊन आधीच पसार झाला व अमरवतीत त्यांना सामील झाला. गंभीर जखमी अवस्थेतील दिनेश बूब यांना तात्काळ उपचारार्थ अकोल्याच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

जुजबी माहितीच्या आधारावर ठाणेदार भाऊराव घुगे आपल्या ताफ्यासह अमरावती कडे रवाना झाले. लुटारूंचा माग काढला व अमरावतीच्या वडाळी परीसरात अमरावती पोलीसांच्या मदतीने चौघांनाही जेरबंद करून पहाटे येथील शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांना खाकीचा खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी केवळ ५० हजार रुपये लुटल्याचे कबूल केले. आरोपींना उद्या न्यायालयातून पीसीआर मिळविण्यासाठी त्यांना न्ययालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार भाऊराव घुगे यांनी दिली.

अनिकेत राजकुमार वर्घट (वय२४)ऑटो चालक अमरावती, कॅटरिंग काम करणारे दोघे आल्पवयीन मुले रहणार वडाळी, प्रबुद्ध नगर अमरावती, सम्यक धनंजय थोरात (वय २०) विद्यार्थी, राहणार वडाळी, प्रबुद्ध नगर या चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली हीरो कंपनीची पॅशन प्रो मोटर सायकल (क्रमांक एमएच २७ डी सी ८४६६) किंमत ५०००० रुपये, अॅपल कंपनीचा मोबाईल किंमत ७०००० रूपये, नगदी ३१००० रू असा एकुण १५१००० रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. या चौघांना सहकार्य करणारा येथील रहिवाशी मात्र सध्या आकोल्यात राहाणारा पवन दहीहांडेकर यालाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

विषेश पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोपळे, पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. भाउराव घुगे, पो उपनि गणेश सुर्यवंशी, पोलीस हवालदार नंदकीशोर टिकार, सुरेश पांडे, सचिन दांदळे, मंगेश विल्हेकर, पोलीस कॉस्टेबल सचिन दुबे, गजानन खेडकर, स्वप्नील खडे, भुषन नेमाडे, सायबर पो स्टे चे गोपाल ठोंबरे यांनी सदरचा गुन्हा उघड करण्यात यश मिळविले असुन पुढील तपास पो. नि. भाउराव घुगे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गुन्हा घडल्यानंतर केवळ ९ तासात सलग अथक प्रयत्न करून रात्र जागून काढत आणि वेषांतर करून निमुळत्या गल्ली बोळातून आरोपींना जेरबंद करण्याच्या धाडसी प्रयत्नाबद्दल येथील शहर पोलीसांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT