crime in of a person in a farm 
अकोला

शेतशिवारामध्ये इसमाची निघृन हत्या

सकाळ वृत्तसेेवा

पिंजर (जि.अकोला)  ः बोरगांव मंजू पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवळा खुर्द शेतशिवारामध्ये पद्माबाई रामभाऊ राऊत यांच्या शेतामध्ये सोमवारी (ता. १२) मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या टाकळी पोटे येथील विठ्ठल नथ्थूजी ठाकरे (वय ४५) यांची धारदार शस्त्राने निघृन हत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १३) रोजी सकाळी उघडकीस आली.

गोविंदा नथ्थुजी ठाकरे यांनी योगेश हरिभाऊ जळमकार (रा. टाकळी पोटे) याने मृतक विठ्ठल ठाकरे यांची हत्या केल्याची तक्रार बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी पोटे येथील योगेश जळमकार व मृतक विठ्ठल ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तीक जुने वाद होते.

अशातच सोमवारी (ता.१२) रात्री ९ च्या दरम्यान काही कारणास्तव त्यांच्या पुन्हा खटके उडाले व तो वाद गावकऱ्यांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता. दरम्यान मृतक विठ्ठल ठाकरे हे पद्माबाई रामभाऊ राऊत यांच्या बटाइने केलेल्या जवळा खुर्द शिवारातील शेतामध्ये भुईमूग व कडाऊ या पिकाची रात्री ११ च्या दरम्यान रखवाली करिता गेले होते.

परंतु मंगळवारी (ता.१३) मृतक विठ्ठल ठाकरे सकाळी घरी परत न आल्यामुळे त्यांचा पुतण्या दत्ता गोविंद ठाकरे हा काका घरी परत न आल्यामुळे शेतामध्ये पाहायला गेला असता, त्याला विठ्ठल ठाकरे हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्याचे त्याने वडील गोविंद ठाकरे यांना माहिती दिली. बोरगाव मंजू पोलिस स्टेशनला गोविंद ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून घटनास्थळी एसडीपीओ संतोष राऊत, ठाणेदार सुनील सोळंके, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, बीट जमादार सतीष सपकाळ, नामदेव केंद्रे, मंगेश इंगळे, तुषार मोरे, फइम, पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार महादेव पडघान, बीट जमादार महादेव साळुंके सह आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यासोबतच मृतदेह उत्तरणीय तपासणी करिता सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. आरोपी हा नातेवाईकाच्या घरी फरार होत असताना एलसीबी पथकाने सापळा रचून आरोपी योगेश हरीभाऊ जळमकर यांना तात्काळ अटक करून ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनीलजी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, बीट जमादार सतीष सपकाळ, नामदेव केंद्रे करत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Pune News : सदनिकाधारक, भाडेकरूंना मोठा दिलासा; भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार नाही

SCROLL FOR NEXT