Crops have been damaged at Dhad due to unseasonal rains and strong winds  
अकोला

गारपिटीने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान

सकाळ वृत्तसेवा

धाड (बुलडाणा) : परिसरात झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वार्‍यामुळे पिकांचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक व्यापार्‍यांच्या दुकानाचे टीनपत्रे उडून गेल्यामुळे साहित्य ओले झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, महसूल विभागाने तत्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

चांडोळ येथे अवकाळी पावसामुळे घरावर पडली वीज
 
वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस आल्यामुळे धाडसह करडी, सावळी, बोरखेड येथील शेतकर्‍यांचे रब्बी पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकर्‍यांनी शेतामधील पिके शेतातच ठेवली होते. तर काही ठिकाणी रब्बी पिके यामध्ये मका, गहू यांची सोंगणी बाकी होती. मात्र, आलेल्या जोरदार वार्‍यासह पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. धाड येथील दिगांबर जाधव यांची ५ एकर मक्का जमीनदोस्त झाली. करडी व सावली येथे गारपीट झाल्यामुळे कांदाबीज या पिकांचे नुकसान झाले. रस्त्यावर अनेक झाडे पडली तर काही व्यापार्‍यांच्या दुकानावरील टीनपत्रे उडून गेल्यामुळे साहित्य ओले होऊन नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्यामुळे महसूल विभागाने तातडीने पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरात होत आहे. 

रब्बी हंगामातील पाच एकर मका ही वादळी वार्‍यामुळे संपूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आता जनावरांच्या चार्‍याचा सुद्धा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महसूल विभागाने याबाबत पंचनामा करुन मदत करावी. 
- दिगांबर अश्रुबा जाधव, शेतकरी, धाड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT