Deadline to apply for Akola Marathi News Folk Art Selection List is 21st January 
अकोला

तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची

सकाळ वृत्तसेेवा

वाशीम : " एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्मला " वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जीवनात कलेला खुप जास्त महत्व दिले आहे. माणूस जन्माला आला तेव्हापासुन कलेने जीवन जगावे हेच त्यांचे स्वप्न होते. 

खरंय, कला आपलं जीवन समृध्द करते.मात्र, तुम्हाला कोणतीही लोककला येत असेल तर ही तुमच्यासाठी संधी आहे. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लोककला, पथनाट्याद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला, पथनाट्य (गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारुड इत्यादी) पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे.

याकरिता जिल्ह्यातील अनुभवी संस्थांनी माहिती कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी २१ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

लोककला, पथनाट्य पथकाला विविध विषयांवर (शासकिय योजनांसह) कार्यक्रम, पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किमान दहा जणांचे असावे.

यामध्ये स्त्री-पुरुष, वादक यांचा समावेश असावा. लोककला, पथनाट्य पथक ज्या जिल्ह्यातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करावा. केंद्र सरकाच्या गीत व नाट्य विभागाकडे नोंदणीकृत असल्यास प्राधान्य दिले जाईल. संस्थेकडे स्वतःची ध्वनिक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SIR: मोठी बातमी! महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत 33 टक्के मतदारांची नावे वगळली? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

Government IPO: मोदी सरकारचा मोठा प्लॅन! 3 सरकारी कंपन्यांचे IPO आणण्याची तयारी; जाणून घ्या डिटेल्स

मुंबईकरांचे हाल! मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा, ५ तासापासून लोकल जागेवरच; कधी होणार सुरळीत? महत्त्वाची अपडेट समोर

OTT Rules: ओटीटीवर आता अश्लील कंटेंट 'बॅन'? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

माय डियर फ्रेंड!... ब्राझीलमध्ये निवडणूक जिंकताच लूला यांना PM मोदींचा मेसेज, राष्ट्रपती झाल्याबद्दल केलं अभिनंदन

SCROLL FOR NEXT