Deputy Chief Minister Ajit Pawar has said that Rs 80 crore will be provided for Shivani Airport 
अकोला

शिवणी विमानतळासाठी 80 कोटी मिळणार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : येथील शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी 22 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. ही बाब अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी लक्षात आणून दिले. ही बाब लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी येत्या अर्थसंकल्पात 80 कोटी रूपयांची तरतुद केली जाणार असल्याची घोषणा केली.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजन आराखड्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन भवनात सोमवारी आयोजित बैठकीत अजित पवार यांनी ही घोषणा केली. सध्या शिवणी विमानतळाची धावपट्टी 1400 मीटरची आहे. मात्र ही धावपट्टी 2200 मीटरने वाढविल्यास बोईंग विमाने उतरू शकतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अजित पवार यांच्या लक्षात आणून दिले. यावर बच्चु कडू यांनी अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी शिवणी विमानतळाचा विकास होणे आवश्यक असल्याचे लक्षात आणून दिले. अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चु कडू यांची आग्रही भूमिका पाहून अजितदादा पवार यांनी 22 हेक्टर जमीन संपादन करण्यासाठी 80 कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करणार असल्याची घोषणा केली. 

मानव विकास निर्देशंकात अकोला जिल्हा खूपच मागे आहे. अकोला शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील 5 हजार किमी. पैकी 2300 किमी लांबीचे रस्ते खराब झाले असून रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्याला रस्ते दुरूस्तीसह अन्य महत्वाच्या कामांसाठी जिल्हा नियोजनचा निधी वाढवून तो 200 कोटी रूपये देण्यात यावा, अशी मागणी केली. ही मागणी लक्षात घेत अजित पवार यांनी यावर्षीचा जिल्हा नियोजनचा वार्षिक आराखडा हा 190 कोटी रूपये राहील अशी घोषणा कैली. बैठकीला वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त सचिव श्री.चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियुष सिंह, अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT