did not get any crop loan till now agriculture farmer  Sakal
अकोला

Akola News : साहेब, खर्च करायचा तरी कशातून? एप्रिल गेला तरी पीक कर्ज मिळेना!

एप्रिल संपला तरी अद्याप जिल्ह्यात पीक कर्जाचे वितरण सुरु झाले नसल्याचे दिसून येते. शेतीची मशागत, बि-बियाणे, खते, फवारणी औषधी कशी खरेदी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

योगेश फरपट

अकोला : एप्रिल संपला तरी अद्याप जिल्ह्यात पीक कर्जाचे वितरण सुरु झाले नसल्याचे दिसून येते. शेतीची मशागत, बि-बियाणे, खते, फवारणी औषधी कशी खरेदी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे प्रशासनामार्फत बँकांना उद्‍दीष्ट सुद्‍धा निश्चित करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

जिल्हयातील शेतकऱ्यांच्या नशीबी सुरुवातीपासूनच दुःखच आले आहे. गतवर्षी खरिपाचा हंगाम हाती आला अन् शेवटच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. त्यानंतर मोठ्‍या हिंमतीने रब्बीची पेरणी केली.

गहू, हरभरा, पालेभाज्या, ज्वारी, फळबागा चांगल्या बहरल्या होत्या. मात्र डिसेंबर, जानेवारीत झालेल्या पावसाने पिकांची मोठ्‍या प्रमाणात हानी झाली. खरिपाबरोबर रब्बीचाही हंगाम हातचा गेला. यामुळे शेतकरी पुरता खचून गेला.

नुकतेच एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने उरले सुरले होते पीकही हातचे गेले आहे. हाती एक पैसाही शिल्लक नाही. आता यावर्षी शेतीची मशागत, बि-बियाणे,खते, किटकनाशके आदी कसे खरेदी करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायट्‍या, खासगी, सरकारी बँकांमध्ये कर्जाची फाईल जमा केली आहे. मात्र त्याकडे ढुंकूनही पहायला अधिकाऱ्यांना वेळ नाही. उद्या या, परवा या, आज वेळ नाही अशी नानाविध कारणे सांगून शेतकऱ्यांना नकारघंटा दिली जात आहे.

पेरणी सोडा मशागतीचा प्रश्न

आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसमोर खरीपाच्या पेरणीचा सोडा पण शेतीची मशागत कशी करायची हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सर्वच बँकेत पीक कर्जाचे अर्ज भरून देण्यासाठी शेतकऱ्यांची बँकामध्ये गर्दी दिसत आहे. राष्ट्रीयकृत बँकासह खासगी बँकांकडे सुद्धा शेतकरी खरीपाचे कर्ज मिळावे यासाठी आग्रह धरीत आहेत. जिल्हाभरातील सर्वच बँकामध्ये घेतलेले जुने कर्ज भरून घेवून नव्याने कर्ज देण्यासाठी बँक अधिकारी सांगत आहे.

जुने भरले, नवे तर द्या

पीक पुर्नगठण करून घेतल्यानंतरच नवीन कर्ज मिळेल अशी भूमिका राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतली जात आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांनी जुने कर्जही भरले. तरी नवीन कर्ज देण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याचे दिसते.

पीक कर्जासाठी या कागदपत्रांची आवश्यकता

  • नमुना ८ अ उतारा

  • सातबारा उतारा

  • सोसायटीचा कर्ज नसलेला दाखला

  • नो ड्यूज प्रमाणपत्र

  • चार फोटो

पीक कर्ज वाटपाला कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया नियमानुसार करावी.

- नयन सिन्हा, जिल्हा व्यवस्थापक, लिड बँक अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा, पाणीटंचाईला दिलासा!

Nagpur News : सांगा, कसं करायचं आपत्ती व्यवस्थापन? अनेक गावं धोकादायक पातळीवर, पण सरकार अजूनही झोपेत, ९१ गावांत ‘व्हिलेज किट’च नाही...

Guru Purnima : 'श्री स्वामीचरणी तीन लाख भाविक नतमस्तक'; स्वामीनामाच्या जयघोषात श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी

11th Admission Process: अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 'या' तारखेला होणार जाहीर; जाणून घ्या जाणून घ्या प्रवेशाचे पुढचे टप्पे

धक्कादायक! प्रेमसंबंधातून जन्मदात्या आईने पोटच्या तीन निष्पाप मुलांची केली हत्या; प्रियकराला जन्मठेप तर, आईला मृत्युदंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT