Eknath Shinde
Eknath Shinde 
अकोला

Eknath Shinde : शिंदे गटात अंतर्गत वाद पेटला, कमिशनखोरीचा आराेप, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक!

सकाळ डिजिटल टीम

अकोला : राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे व चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे. तर शिंदे गटाचे आमदार जल्लोष साजरा करत आहेत. मात्र विकास निधीवरून शिंदे गटात चांगचील जुंपली आहे. त्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. 

विकास निधीवरून शिवसेनेच्या शिंदे गटात सुरू असलेल्या वादावर ताेडगा काढण्यासाठी गुरुवार, ता.२३ फेब्रुवारी राेजी मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे. 


माजी आमदार तथा संपर्क प्रमुख गाेपीकिशन बाजाेरीया यांच्यावर निधी वितरणात त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांनी थेट कमिशनखोरीचा आराेप केला होता. आरोप करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष अश्विन नवले, महानगराध्यक्ष याेगेश अग्रवाल,  शशिकांत चाेपडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठलेल्या पत्रातून हा आरोप केला हाेता. 

त्यानंतर वाशीम जिल्हा दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता विमानतळावरही या पदाधिकाऱ्यांनी  भेटून त्यांची बाजू मांडली होती. मुख्यमंत्र्यांच्या दरबारात विषय पोहोचल्याने त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी गुरुवारी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्यात सर्वांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईत हाेणाऱ्या बैठकीत सर्व बाबी स्पष्ट करू, असे संपर्क प्रमुख गाेपीकिशन बाजाेरीया यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT