Ration sakal
अकोला

Ration : दिवाळी तोंडावर; तरी शिधाचा अपुरा पुरवठा

अवघ्या पाच, सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाची सर्वत्र लगबग पहायला मिळत आहे. अशातही आनंदाचा शिधा अपुराच मिळाल्याने नागरिकांनी निराशा होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - अवघ्या पाच, सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाची सर्वत्र लगबग पहायला मिळत आहे. अशातही आनंदाचा शिधा अपुराच मिळाल्याने नागरिकांनी निराशा होत आहे.

बाजारातही दिवाळी निमित्त विविध खाद्य पदार्थ व वस्तू विक्रीची दुकाने सजली आहेत. ही दिवाळी गरीबांसाठीही विशेष असून, त्यांच्यासाठी यंदाही राज्य सरकारने शंभर रुपयात आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला आहे.

परंतु, या शिधाचा पुरवठा शंभर टक्के न झाल्याने पोहा, मैदा, चणा डाळ, मैदा व साखरेचा पूर्ण क्षमतेने पुरवठा अद्याप बाकी आहे. परंतु त्यानंतर ही पुरवठा विभागाने प्राप्त संचावर वाटप सुरू केले असून, दिवाळी आधीच २५ हजार लाभार्थ्यांच्या घरत शिधा पोहोचला आहे. उर्वरीत लाभार्थ्यांच्या घरातही शिधा पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस समाविष्ट असलेले शिधाजिन्नस संच ‘आनंदाचा शिधा’ दिवाळी उत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सदर आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ई-पॉस प्रणालीद्वारे शंभर रुपयांमध्ये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येईल. याबाबतचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबत शासनादेश जारी केला. त्यानुसार जिल्ह्यातील तीन लाखावर रेशनकार्डधारक आनंदाच्या शिधासाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान आता आनंदाच्या शिधाचे वाटप सुरु झाले आहे. परंतु पुरवठाही अपूर्ण आहे.

असे होत आहे वाटप

एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच लाभार्थ्यांना देण्यात येत आहे.

असा आहे प्राप्त संच

रवा ३ लाख २५ हजार ९०९, साखर ३ लाख २५ हजार ७४८, चणाडाळ ३ लाख १४ हजार ४८९, पामतेल तीन लाख २५ हजार ८५२, पोहा दोन लाख २९ हजार ३४८, मैदा तीन लाख १८ हजार ३८१ संच पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहे.

अप्राप्त शिधाजिन्नस संचची संख्या

संच संख्या

साखर १६१

चणा डाळ ११२२०

पामतेल ५७

पोहा ९६५६१

मैदा ७५२८

जिल्ह्यातील तीन लाखावर लाभार्थ्यांसाठी आनंदाच्या शिधाची मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे करण्यात आली होती. शिधा संच मिळाल्याने वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. काही शिधाचा पुरवठा बाकी असल्याने त्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान लाभार्थ्यांना वाटपही सुरू करण्यात आले आहे.

- बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT