अकोला ः जगभरात सुरू असलेला कोरोनाचा कहर दिवसेंदिवस व्यापक रूप धारण करत असून, त्याचा फैलाव भारतासह अनेक राज्यात सूरू आहे. आता अकोल्यात सुद्धा कोरोना रुद्ररुप धारण केले असून, जनसामान्यात एकच खळबळ उडाली आहे. असे असतानासुद्धा मला काही होणार नाही या भ्रमात न राहता नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणे टाळणे सोईचे होणार आहे.
अकोला जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाने गुणाकार करण्यास सुरुवात केली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासन अलर्ट झाले आहे. शहरातील अर्धाहून अधिक परिसरही सील झाले आहेत. मात्र, आता प्रशासनाने कोरोना विरुद्ध उभारलेल्या या लढ्यात नागरिकांच्या विशेष सहकार्याची गरज आहे. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला होता. आता राज्यातील बाधितांची संख्या लाखाच्या जवळ जाऊन पोहचली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. आणि संशयितांचे संख्येतही लक्षणीय वाढ होतांना दिसते. जगभरात आतापर्यंत कोरोनाचे लाखांहून अधिक बाधीत असून, बहुतांश जणांचे बळी गेले आहेत. याचीच खबरदारी म्हणून देशात लॉकडाउनही केले आहे. नागरिकांना घराबाहेर निघण्याकरिता शासनाने निर्बंध घातल्यानंतरही मात्र, आपण आपल्या दिनचर्यामध्ये बदल करण्यात अजूनही कमी पडतोय त्यामुळे वेळ गेली नाही. कोरोनाचे आलेले संकट गंभीर आहे. त्यामुळे घरातच रहा सतर्क रहा.
दररोज मार्केटला कशासाठी?
अत्यावश्यक सेवा या वगळण्यात आल्या आहेत. मात्र अनेक कारणे सांगत शुल्लक कारणावरून घराबाहेर निघणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दररोज मार्केटला जावून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती असताना नागरिकांचा बेजबाबदारपणा जीवावर बेतू शकते त्यामुळे विनाकारण घराबाहेर निघणे म्हणजे समुह संसर्गाचा धोका वाढविण्याचे लक्षणे आहे.
ग्रामीण भाग अजूनही बेदखल
राज्यात दिवसागणिक कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होत असताना संशयित रुग्णाच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, ग्रामीण भागात नित्याच्याच कामावर भर देण्यात येत असून, नागरिक सर्रासपणे कुठलीही शरीराची काळजी न घेता अजूनही टोळक्याने एकत्र येत आहे. कोरोनाचा फारसा प्रभाव ग्रामीण भागातील राहिवासीयांना नसून शासनाच्या वतीने जनजागृतीची नितांत गरज आहे. तसेच पोलिस प्रशासनही ग्रामीण भागात भेट देण्यात फारसे लक्ष देत नसल्याने गावात मोकाट फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.