file photo 
अकोला

पेरणीची घाई नको, मॉन्सूनच्या आगमनासाठी आठवडाभराची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः सध्या पडत असलेला पाऊस (Rain In Akola) हा पूर्व मोसमी असून, मॉन्सूनच्या आगमनासाठी (Monsoon arrivesअजूनही आठवडाभराची प्रतीक्षा वैदर्भीयांना करावी लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, असा सल्ला कृषी हवामान तज्ज्ञ तसेच कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. (Don't rush sowing, wait a week for the arrival of monsoon)

देशात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानपासून ते म्यानमारपर्यंत विस्तारलेले असून, थायलंडच्या किनारी प्रदेशात आणखी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने जमिनीपासून वर दीड ते तीन किमी पट्यात वाऱ्याचा ओघ हा थायलंडकडे होताना उपग्रह छायाचित्रामध्ये दिसून येत आहे. या प्रवाहाच्या बदलाने राज्यात हवेतील बाष्पचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे.

परंतु, सध्या पूर्व मोसमी वाऱ्याचा जोर दिसत असून, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशीम, यवतमाळसह अमरावती मधील मेळघाट डोंगर रांगा, मोर्शी, वरुड (म.प्र. सीमे लगत), अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, यवतमाळ-वाशीम जिल्हा सीमा क्षेत्र, पुणे विभागात पुणे-नगर सीमा परिसरात गडगडाट सोबत पूर्व मोसमी पाऊस बरसणार असल्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.


राज्यात पूर्व मोसमी पावसाचे वातावरण पुढील काही दिवस स्थानिक स्वरूपात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. राज्यात मॉन्सूनचे स्वाभाविक आगमन अजूनपर्यंत झालेले नाही. जो स्थानिक स्वरूपाचा पाऊस बरसत आहे, तो पूर्व मोसमी आहे. धूळ पेरणी किंवा मुख्य पेरणीकरिता पोषक वातावरण तयार झालेले नाही. नियमित पावसाकरिता आवश्‍यक असलेली हवेतील आद्रतेची पातळी अपुरी आहे. वाऱ्याची दिशा पूर्णता नैऋत्य दिशेकडून नाही. विदर्भात पाऊस देणारी मॉन्सूनची बंगालच्या उपसागरातील शाखा आणि हवेचा ओघ सध्यातरी म्यानमार, थायलंड देशाकडे जास्त आहे. वऱ्हाड, मराठवाड्यामध्ये नियमित पावसाळा सुरू होण्याची संभाव्य तारीख १५-२० जूनच्या दरम्यान राहण्याची शक्यता.
- संजय अप्तुरकर, कृषी हवामान तज्ज्ञ, नागपूर

संपादन - विवेक मेतकर

Don't rush sowing, wait a week for the arrival of monsoon

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT