Due to abundant water and nutritious environment in Akola, the wheat crop is looking strong 
अकोला

यंदा गहू दमदार ! मुबलक पाणी आणि पोषक वातावरण ठरले लाभदायक

अनुप ताले

अकोला : पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी अन् अवकाळीने अख्खा खरीप उद्‍ध्वस्त केला. रब्बीतील हरभऱ्यालाही बुरशीचा मोठा फटका बसला. परंतु, मुबलक पाणी आणि पोषक वातावरण मिळाल्याने गव्हाचे पीक मात्र दमदार दिसत असून, जोमदार उत्पादन होण्याची अपेक्षा गहू उत्पादक शेतकऱ्यांना आहे. 

मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्याने खरिपाची सुरुवातही उशिराच झाली. पेरणी आटोपली अन् पावसाने दीर्घ दांडी मारली. पुन्हा पाऊस सुरू झाला तो अतिवृष्टीची नोंद होईपर्यंत थांबलाच नाही. त्यामुळे खरिपात लवकर येणारे मूग, उडीद व ज्वारी, मक्याचे पीक हाती लागलेच नाही. सोयाबीन सोंगणी, मळणीच्या कालावधीत अवकाळी पावसाने झोडपल्याने सोयाबीनचे उत्पादनही निम्म्यावर आले. 

अतिवृष्टी आणि अवकाळीचा फटका कपाशीलाही बसला. शिवाय गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादकांची उरली सुरली आशाही संपुष्टात आणली आणि कापूस हंगामही निराशा करून गेला. वातावरणातील बदलाचा परिणाम झाल्याने भरघोस उत्पादनाची अपेक्षा असणाऱ्या तुरीनेही शेतकऱ्यांची निराशा केली. अतिवृष्टीमुळे जमिनीला चांगली ओल असल्याचा लाभ मात्र रब्बीत होईल असा अंदाज बांधला जात होता. परंतु, हरभऱ्याला ऐन गाठे धरण्याच्या दिवसात थंडीने दांडी मारल्याने व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हरभऱ्याचे उत्पादनही ४० ते ५० टक्के घटले. आता केवळ हरभरा पिकापासून शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 

यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने व जमिनीलाही चांगली ओल असल्याने जिल्ह्यात ११४ टक्के म्हणजे, १७ हजार २०५ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना १९ हजार ६५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली. अपेक्षित पाणी व वातावरण मिळाल्याने पीकही चांगलेच बहरले. काही भागात गहू काढणीसुद्धा झाली असून, बहुतांश भागात काढणी सुरू आहे. काही ठिकाणी उशिरा पेरणी झाल्याने अजूनही काढणीसाठी एक ते दोन आठवड्याचा अवधी बाकी आहे. परंतु, सध्या अवकाळी पावसाची शक्यता कमी असल्याने, गहू उत्पादकांना भरघोस उत्पादनाची शाश्‍वती वाटत आहे. 

अवकाळीचा बार फुसका 

दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीठ होण्याची शक्यता राहते. यंदाही तशाच प्रकारचे वातावरण तयार झाले होते व हवामान तज्ज्ञांनीही तसा इशारा दिला होता. परंतु, जिल्ह्यात केवळ तेल्हारा तालुक्यात काही गावांमध्ये तुरळक ठिकाणी गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने अल्प हजेरी लावली. एकंदरीत यावर्षी जिल्ह्यात अवकाळी व वादळी पावसाचा बार फुसका गेल्याने, गव्हाचे भरघोस पीक उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येण्याची शक्यता आहे. 

सध्या तापमानात वाढ होत असून, अवकाळी किंवा वादळी पावसेचे वेध तुर्तास तरी विदर्भात दिसून येत नाहीत. वातावरणात बदल झाल्यास आठवड्याच्या शेवटी काही तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो. 
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT