अकोला

हे खरंय! सोयाबीनला मिळतोय सोन्याचा भाव; भाव वाचून व्हाल अवाक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गेल्यावर्षीपर्यंत सोयाबीनला प्रतिक्विंटल चार हजार रुपये भाव मिळणेही चमत्कारी वाटत होते. आता मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल दहा हजारांहून अधिक भाव मिळत आहे. शनिवारी अकोला बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल दहा हजार १०० रुपये भाव मिळाला. सुरू असलेली भाववाढ लक्षात घेता नवीन उत्पादनालाही चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यासह विदर्भात खरिपामध्ये सर्वाधिक पेरा असणारे व सर्वाधिक उत्पादित होणारे पीक म्हणजे सोयाबीन. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या खरिपामध्ये सोयाबीन पिकापासून सर्वाधिक अपेक्षा राहतात. परंतु, दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव व इतर कारणांमुळे सोयाबीन पिकाचे उत्पादन सातत्याने घटत आहे. सोबतच व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षाही कमी दराने म्हणजे दोन ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दरानेच सोयाबीनची खरेदी होत असल्याने सोयाबीन उत्पादकांना सातत्याने नुकसान सोसावे लागत आहे.

शासनाच्या हमीभाव केंद्रावर सुद्धा सोयाबीन विक्री करताना शेतकऱ्यांना विविध अटी, शर्तीची पूर्तता करावी लागते. त्यातही कोणत्याना कोणत्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाची खरेदी होत नाही व झाली तरी, चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांना महिनो प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना अल्पदरातही त्यांचे सोयाबीन विकायला तयार होतात.

मात्र, गेल्या हंगामात बाजार समित्यांमध्ये पहिल्यांदाच हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला. त्यामुळे हमीभाव केंद्रापेक्षा बाजार समित्यांमध्ये आवक अधिक राहिली, तरीसुद्धा भाववाढ सुरू राहिली. दोन दिवसांत तर सोयाबीनने दहा हजाराचा आकडाही पार केला असून, शनिवारी (ता. ७) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंतचा उचांकी दहा हजार १०० रुपये भाव मिळाला.

यंदा सोयाबीनची पेरणी १०५ टक्के

गत खरिपात सोयाबीनचे उत्पादन घटले असले तरी, हाती आलेल्या उत्पादनाला बाजार समितींमध्ये हमीभावापेक्षा दुप्पट, तिप्पट भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सुद्धा सोयाबीन पेरणीलाच प्रथम पसंती दिली. त्यामुळे कृषी विभागाने आखलेल्या दोन लाख १८ हजार ८६ हेक्टरच्या तुलनेत १०५ टक्के म्हणजे दोन लाख २९ हजार ४५२ हेक्टरवर जिल्ह्यात सोयाबीन पेरणी झाली आहे.

व्यापारी मालामाल

एरव्ही सोयाबीनला बाजार समितीमध्ये हमीभाव सुद्धा मिळत नाही. मात्र, गेल्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच त्यांच्याकडील सोयाबीन चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापाऱ्यांना विकून हात मोकळे केले. आता मात्र, शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसून, सुरुवातीला कमी भावात खरेदी केलेले सोयाबीन दुप्पट भावात विकून व्यापारी वर्गच मालामाल होत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Padole Accident : काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात; कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले

करण जोहरने अनन्याला केला चुकीचा स्पर्श? नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाले...'अभिनेत्रींना अशा स्पर्शांचं काहीच कसं...' Viral Video

Latest Marathi News Live Update : अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदी काठावर नवीन घाट बांधण्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांची मंजुरी

Iran Attack Kuwait : कुवेतच्या वीजनिर्मिती आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर इराणचा मोठा हल्ला; भारतीय कामगाराचा मृत्यू

Vidarbha News: पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल; सार्वजनिक सुरक्षेसाठी पेट्रोल पंप नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

SCROLL FOR NEXT