शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; १८ मेट्रिक टन खते मिळणार जुन्याच दराने File photo
अकोला

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; १८ मेट्रिक टन खते मिळणार जुन्याच दराने

कृषी विभागाचे नियाेजन; यावर्षी ७७ हजार ९९० मेट्रिक टन साठा मंजूर

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Akola) कृषी विभागाने कोरोना (Corona) संकटातही खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खत वितरणाचे नियोजन केले आहे. खताचे दर वाढले असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १८ मेट्रिक टन खत जुन्याच दराने वितरित केले जाणार आहे. जिल्ह्याला ९५ हजार ७०० मेट्रिक टन खताची गरज असून, त्यातील ७७ हजार ९९० मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. Farmers in Akola will get 18 metric tons of fertilizer at the old rate

खरीप हंगामासाठी बियाणे-कृषी निविष्ठाची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत कमी पडू नये म्हणून नियोजन केले जात आहे. कोरोना संकटात आधीच शेतकरी कृषी निविष्ठा वेळेवर मिळत की नाही म्हणून चिंतेत आहे.

गतवर्षी अशीच परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांना खतासाठी कृषी सेवा केंद्रांपुढे रांगा लावाव्या लागल्या होत्या. यावर्षी तर खताचे दरच वाढले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एप्रिल ते सप्टेंबर या खरीप हंगामासाठी खताचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जात आहे. त्यानंतरही खताची टंचाई भासल्यास खरीप पेरणीचे क्षेत्र पाहून वाढीव मागणी करणार असल्याचेही कृषी विभागाचे म्हणणे आहे. यावर्षीसाठी ७७ हजार ९९० मेट्रिक टन मंजूर झाले आहे. यापूर्वीच जिल्हा परिषद कृषी विभागे १८ मेट्रीक टन खत जुन्या दराने वितरणाचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यासाठी मंजूर खतसाठा

खतांचे नाव मंजूर साठा (मे.टन)

युरिया २३१७०

डीएपी १६१२०

एमओपी ४३५०

एनपीके २२९८०

एसएसपी ११३७०

एकूण ७७९९०

संपादन - विवेक मेतकर

Farmers in Akola will get 18 metric tons of fertilizer at the old rate

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT