अकोला

आधी कोरोना चाचणी, मगच पुढील प्रवास

जिल्हा बंदी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस. यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि.वाशीम) ः जिल्हा बंदी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस. यांचे आदेशानंतर महसूल व पोलिस प्रशासन सतर्क झाला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केल्या जात आहे.

यावर तहसीलदार अजित शेलार व ठाणेदार एस.एम. जाधव स्वतः लक्ष घालून आहेत. प्रशासनाच्या वतीने लोणार-मेहकर फाटा सेनगाव रोड, वाशीम रोड या ठिकाणी लावण्यात आलेल्या शिबिरात वाहनांना थांबून त्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे.

याच्या व्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या लोकांची सुद्धा चाचणी केली जात आहे. चाचणी केल्यानंतर अहवाल संबंधित व्यक्तीच्या गावी संबंधित प्रशासनाला कळविण्यात येणार आहे. यामुळे कोरोणाची चेन तोडण्यात हे पाऊल उपयुक्त ठरेल असे त्यांच्याकडून बोलल्या जात आहे. जिल्ह्याच्या सीमेंवर पोलिसांच्या पहारा व्यतिरिक्त आरोग्य प्रशासनाच्या वतीने प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जात आहे.

जिल्हा परतीच्या आदेशाच्या अनुषंगाने तहसील कार्यालय व पोलिस प्रशासनाच्या वतीने सकाळी अकराच्या नंतर बिनकामी फिरणाऱ्या व्यक्ती व तसेच शहरा बाहेर जाणाऱ्या व जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची चाचणी केली जात आहे. जेनेकरून यामुळे कोरोनाची साखळी तोडली जाऊ शकल्याचे तहसीलदार अजित शेलार यांनी सांगितले.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police : खाकी वर्दीतील देवदूत ! पुण्यात पोलीस शिपायाने वाचवले प्रौढाचे प्राण, धाडसाचे होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : विदर्भात आज किमान तापमानात घट होण्याची शक्यता; राज्यात थंडी गायब

CJI Suryakant : भारताचे नवे सरन्यायाधीश Justice Surya Kant यांच्या 10 निकालांनी हादरवलाय देश, आता पुन्हा आलेत चर्चेत

दिलदार मनाचा माणूस! धर्मेंद्र यांनी स्वतःच्या मुलांना नाही तर चुलत भावांना देऊ केलेली 'इतकी' मोठी जमीन, जेव्हा परत गेले तेव्हा...

शरीराचा सुंगध येण्यासाठी जॅकलिन दुधात मिसळते 'हा' खास पदार्थ, म्हणते...'चमकदार त्वचा आणि सुगंधासाठी...'

SCROLL FOR NEXT