Five Days Before Wedding Man Commits Suicide In Akola Maharashtra sakal
अकोला

लग्नाआधी आत्महत्या; बस्ता बांधायला आलेले पाहुणे अंत्ययात्रेत झाले सहभागी

लग्न पाच दिवसांवर येऊन ठेपलय. अंगाला हळद लागणार, तोच युवकाने गुरांच्या गोठ्यात गळफास

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : लग्न पाच दिवसांवर येऊन ठेपलय. अंगाला हळद लागणार, तोच युवकाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी बाळापूर तालुक्यातील मोरझाडी या गावात घडली आहे. उरळ पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

श्याम फुकट असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. श्यामची बाळापूर तालुक्यातीलच एका गावातील युवतीशी सोयरीक जुळली होती. आई- वडिलांनी आदर्श लग्न ठरवले होते. गुरुवारी, ता. १० फेब्रुवारी रोजी हे आदर्श लग्न होणार होते. त्यासाठी दोन्ही कडील मंडळींनी आज शुक्रवारी बस्ता घेण्याचे ठरवले होते. मात्र, लग्नाच्या बस्त्याची तयारी सुरू असतानाच श्यामने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊ वाजता श्यामने मित्रांशी गप्पा मारल्या, आणि कुणालाही काही न सांगता थेट बैलांचा गोठा गाठला आणि तेथे दोरीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या केली.

बस्त्यासाठी आलेले पाहुणे झाले अंत्ययात्रेत सहभागी

शुक्रवारी श्यामचा बस्ता घेण्याचा कार्यक्रम होता. त्यासाठी अंगणात पाहुणे मंडळी जमली होती. अशातच शामने आत्महत्या केल्याची बातमीच पाहुण्यांच्या कानावर पडली. सर्वांनी गोठ्याकडे धाव घेतली. सर्वांनी शामला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहिले. माहिती मिळताच सर्व नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उरळचे ठाणेदार अनंत वडतकर व पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार मध्ये पाठवला. अचानक आत्महत्येसारखे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, पोलिस याचा सखोल तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT