molesting minor gir sakal
अकोला

अकोला : अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्यास पाच वर्षांची शिक्षा

अल्पवयीन बालिकेचा पाठलाक करून तिचे सोबत तिला लज्जा वाटेल असे कृत्य करून त्रास दिला

सकाळ वृत्तसेवा

अकोला : विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.व्ही.डी. पिंपरकर यांचे न्यायालयाने पोस्को कायद्यांतर्गत बाळापूर येथील गुलाम शाकीर गुलाम जकिर याल अल्पवयीन बालिकेचा पाठलाक करून तिचे सोबत तिला लज्जा वाटेल असे कृत्य करून त्रास दिल्या बद्दल दोषी ठरवत पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सोबत एकूण २० हजार रुपयांचा दंडही आकारला आहे.

बाळापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ता. २९ डिसेंबर २०१६ रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. पीडित अल्पवयीन मुलीस ती शाळेत जात- येत असताना पाठलाग करून गुलाम शाकीर गुलाम जकिर हा त्रास देत असे व तिचे घरासोमोरून चक्रा मारीत असे. एकदा त्याने तिला रस्त्यात अडवून असभ्य वर्तन केले. त्यामुळे पीडितेने त्याचे विरुद्ध फिर्याद दिली. सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षिदार तपासन्यात आले. पीएसआय एम. बी. वाघमोडे व पीएसआय विणा भगत यांनी तपास केला. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT