buldana
buldana e sakal
अकोला

पुरात चारचाकी गेली वाहून, वाहनात प्रवासी असल्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : सिंदखेड राजा (sindhkhed raja buldana) तालुक्यातील विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या वर्दडी सोनोशी पुलावर पुराचे पाणी होते. यामध्ये एक चारचाकी वाहन वाहून गेल्याची घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये जीवितहानी झाली आहे का? याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, वाहनांमध्ये असलेले काही प्रवासी वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्रात पाऊस कोसळतो आहे. गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. काही पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. तसेच गेल्या तीन दिवसांपासून सिंदखेड राजा तालुक्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वर्दडी पुलावरून सतत पाणी वाहत आहे. ग्रामस्थांचा तालुक्यासोबत संपर्क तुटला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास पुलावरून पाणी वाहत असताना चालकाने चारचाकी वाहन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनच पुराच्या पाण्यात वाहून गेले. आज सकाळी ग्रामस्थ शेताकडे जात असताना ही घटना उघडकीस आली. वाहनामध्ये किती प्रवासी प्रवास करत होते. प्रवासी नेमके कोणत्या गांवातील होते. वाहनांमध्ये असलेले प्रवासी पुरामध्ये वाहून गेले का? याचा माहिती अद्याप मिळाली नाही.

पुलाची उंची वाढवण्याची गरज -

वर्दडी-सोनोशी पुलांची उंची खूपच कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच वाहतुकीसाठी पूल बंद होतो. वर्दडी येथील शेकडो शेतकऱ्यांची शेती पुलाच्या पलीकडे आहे. त्यामुळे नेहमी पुलावरूनच शेतकऱ्यांना येणे-जाणे करावे लागते. थोडाही पाऊस पडल्यानंतर पूल वाहतुकीसाठी बंद होतो. त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT