Following in the footsteps of the revenue department, the police have also turned their attention to illegal marches 
अकोला

महसूल पाठोपाठ पोलिसांचीही अवैध रेतीवर कारवाई; टाटा 407 वाहनासह आठ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त

धीरज बजाज

हिवरखेड (अकोला ) : महसूल विभागाच्या पाठोपाठ आता पोलिसांनीही अवैध तिकडे मोर्चा वळविल्याने प्रति माफियांचे धाबे दणाणले आहेत. (ता. 27) फेब्रुवारी शनिवारी रोजी पहाटे नाकाबंदी करत होते.

त्यावेळी हिवरखेड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अडगाव बु. येथील आठवडी बाजार जवळील पुलावर नाका-बंदी दरम्यान मालठाणा गावाकडून एक चार चाकी टाटा 407 वाहन येताना दिसले. त्या वाहनास थांबवले असता सदर वाहन क्रमांक एम एच 28 ए बी 5436 मध्ये 2 इसम मिळून आले. त्यांच्या ताब्यातून टिप्परमध्ये एक ब्रास रेती किंमत अंदाजे पाच हजार आणि वाहन अंदाजे आठ लक्ष असा आठ लक्ष पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना सदर रेतीबाबत परवाना विचारला असता त्यांच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे माहिती मिळाली. त्यामुळे वरील दोन्ही इसमांनी शासनाचा रेती वाहतुकीबाबत त्यांच्याकडे परवाना नसल्याने सदरचे जप्ती करण्यात आली. 

चालक अब्दुल शाकीर, अब्दुल जाकीर वय 30 आणि शेख मुजफ्फर शेख करीम वय 42 दोन्ही राहणार दानापूर ता. तेल्हारा अशी आरोपींची नावे आहेत. हिवरखेड पोलिसांनी दोन्ही आरोपीं विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 379 188 34  नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पांडुरंग राऊत, निलेश बोरकुटे, प्रवीण गवळी, आकाश राठोड, इत्यादींनी केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. सदर कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT