अकोला

माजी आमदार संजय गावंडे यांची बाजार समितीच्या सहसचिवांना मारहाण

सकाळ डिजिटल टीम

अकोट (जि.अकोला) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहसचिवांना कर्तव्यावर असताना अश्लिल शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार संजय लक्ष्मण गावंडे यांच्या विरोधात अकोट शहर पोलिस स्टेशनला शनिवार (ता.१७) रात्री विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोट शहर पोलिसांनी गावंडे यांना रविवारी अटक केली. त्यांनी न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज नामंजूर झाला असून,त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


या प्रकरणी बाजार समितीचे सहसचिव विनोद रमेश कराळे (वय ४८, रा. गांधीबाग अकोट) यांनी ता. १७ एप्रिल रोजी ७.२२ वाजताच्या सुमारास शहर पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार विनोद रमेश कराळे हे शनिवारी सकाळी ९.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्तव्यावर हजर झाले होते.

सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान कार्यालयात काम करीत असताना माजी आमदार संजय लक्ष्‍मण गावंडे यांनी कार्यालयात येऊन ‘तुम्ही ड्युटी करत नाही तसेच लोकांना योग्य वागणूक देत नाही’ असे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. विनोद कराळे यांची कॉलर पकडून डाव्या गालावर चापट मारली.

यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी गावंडे यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी शिवीगाळ व मारहाण करणे सुरूच ठेवत ‘वेळेवर काम केले नाही, तर तुम्हाला नोकरी करणे मुश्कील करून टाकीन’,अशी धमकी दिल्याचे विनोद रमेश कराळे यांनी अकोट शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमुद आहे.

त्यावरून अकोट शहर पोलिसांनी माजी आमदार संजय लक्ष्‍मण गावंडे यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३५३, २९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हे दाखल करून रविवारी सकाळी त्यांना अटक केली. पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमलदार गणेश निमकर्डे करीत आहेत.
.....................
न्यायालयीन कोठडीत रवानगी
अकोट शहर पोलिसांनी गावंडे यांना रविवार सकाळी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन न मंजूर करून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

संपादन - विवेक मेतकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT