अकोला

मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात माजी आमदारांचा ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

वाशीम ः चार वर्षापूर्वी तब्बल दहा कोटीच्यावर पैसे खर्च करून निर्माण होत असलेल्या टेंम्पल गार्डनची आताच दूरावस्था झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने व्हायब्रंट विदर्भ सदरात हा मुद्दा प्रकाशित केला होता. याबाबत आता नगरसेवक व लोकप्रतिनीधी आक्रमक झाले असून, सोमवारी (ता.१२) माजी आमदार विजय जाधव यांनी नगरसेवकांसह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देवून जाब विचारला आहे. (Former MLA Vijay Jadhav's seat for Temple Garden)



सात वर्षांपूर्वी शहराच्या उत्तरेला नव्या नगरपालिका इमारतीजवळ असलेल्या १४ एकर जागेतील इंग्रजकालीन टेंपल गार्डन हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी यामधील अर्धे गार्डन व्यापारी संकुलासाठी तयार केले. मुळ म्हणजे बगीच्याचे आरक्षण हटवून व्यापारी संकूल बांधता येत नाही, हा नियम असताना या जागेवर व्यापारी संकूल बांधण्यात आले. त्यावेळी शहरातील काही नागरिकांनी बगीच्याच्या या काँक्रेटीकरणाला विरोध केला होता. मात्र, उर्वरीत जागेत सूसज्य बगीचा साकारेल, असे आश्वासन देवून विरोध दडपण्यात आला होता. तीन वर्षात भव्य व्यापारी संकूल उभे राहीले. मात्र, टेंम्पल गार्डनची कासवगती कायम राहिली.

या जागेमध्ये पालिकेच्या वतीने सुरक्षा भिंत व चार झोनच्या कामाचे कंत्राट देण्यात आले होते तसेच मोनोरेल, तारांगण, अ‍ॅडव्हेंचर पार्क यासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र, तरीही या बगीच्यामध्ये सध्या रान उठले आहे. दक्षिणेकडील प्रवेशव्दारातून गुरे, असामाजिक तत्वे यांचा वावर राहतो. अंतर्गत रस्त्यांमध्ये पेव्हर ब्लॉक उद्यान सुरू होण्याआधीच उखडले गेले आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ठेवलेला रनगाडा दुर्देवाचे दशावतार सांगत उभा आहे. अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये असलेले झुले रानवेलीच्या विळख्यात गेले आहेत. निधीची कमतरता असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, उपलब्ध निधीतील कामेच कासवगतीने होत असल्याने शहरात सध्या एकही बगीच्या उभे राहण्यालायक राहिला नाही. याबाबत ‘सकाळ’ने व्हायब्रंट विदर्भ सदरात या बगीच्याची दूरावस्या प्रकाशित केली होती. याची दखल घेत माजी आमदार विजय जाधव यांच्या नेतृत्वात नगरसेवक अमित मानकर यांच्यासह शहरातील विविध नागरिकांनी मुख्याधिकारी दीपक मोरे यांचा कक्ष गाठून ठिय्या दिला. या कामाची संपूर्ण माहिती देण्याची मागणी करण्यात आली.

संपादन - विवेक मेतकर

Former MLA Vijay Jadhav's seat for Temple Garden

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT