अकोला

दर्शन घेऊन परतणाऱ्या चार युवकांवर काळाची झडप

सकाळ वृत्तसेवा

अनिल दंदी

बाळापूर (जि.अकोला) : महामार्गावरून सुसाट वेगाने धावणारी युवकांची कार समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात कार मधील तीन युवक जागीच ठार झाले, तर कार चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हि दुर्दैवी घटना काल गुरुवारी (ता. ८) रोजी मध्यरात्रीनंतर राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ घडली. (Four died in car truck accident in Akola)

विशेष म्हणजे रस्त्याने दोन वेळा बचावलेले हे युवक शेवटी तिसऱ्यांदा मृत्यूच्या दाढेत पोहोचले. धनजंय नवघरे, (२१) विशाल नवघरे, (२२)मंगेश नामदेव राऊत( २८) व चालक शुभम कुटे (२३) अशी मृतांची नावे आहेत. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी (कुटे) येथील चार समवयस्क युवक हे काल गुरुवारी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. काल गुरुवारी त्यांनी दर्शन घेतले व रात्री जेवण आटोपून ते आपल्या गावाकडे (एमएच ३७ बी ८२६२) या वाहनाने परतीच्या प्रवासाला निघाले होते. शेगाव मागे टाकल्यानंतर त्यांनी आपले वाहन सुसाट वेगाने पळवायला सुरुवात केली. यावेळी शुभम कुटे हा वाहन चालवित होता.

राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर नजीक दोन वेळा समोरील वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात त्यांच्या कारला धडक बसत होती, मात्र ते थोडक्यात बचावले. अशी माहिती त्यांच्या वाहनाच्या मागे असलेल्या अकोल्यातील प्रवाशांनी दिली. त्यांना समज देऊनही त्यांनी न ऐकता वाहन भरधाव पळवले. अखेर तिसऱ्यांदा त्यांची कार रिधोरा नजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ ओव्हरटेक करताना समोरून भरधाव येणाऱ्या एम एच १९ सी वाय ६४०४ या क्रमांकाच्या आयशर ट्रकवर धडकली. हि धडक एवढी जोरदार होती की, या धडकेने कारचा अक्षरशः चुराडा होऊन कार मधील तीघे जण जागीच ठार झाले. तर वाहन चालक शुभम कुटे (२३) हा युवक गंभीर जखमी झाला. घटनची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केन्द्राचे गजानन गावंडे व बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व त्यांचा पोलिस ताफा घटनास्थळी हजर होत त्यांनी जखमी युवकाला सर्वोपचारमध्ये रवाना केले. मात्र उपचारा दरम्यान शुभमचा देखील मृत्यू झाला. या अपघाता मुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.

संपादन - विवेक मेतकर

Four died in car truck accident in Akola

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT