Gitanjali Express derailed The passengers in the coach were shocked 
अकोला

Video : गीतांजली एक्स्प्रेस रुळावरून घसरली; कोचमधील प्रवाशांना बसले धक्के

विनोद इंगोले

अकोला : पैलपाडा नजीक गीतांजली एक्सप्रेसचा एक डब्बा रुळावरून घसरला. मंगळवारी (ता. ९) पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.  रेल्वेचा सर्वांत शेवटचा गार्ड डब्बा घसरल्याने प्राणहानी झाली नाही.

हावडावरून मुंबईकडे निघालेली गीतांजली एक्सप्रेस पैलपाडा रेल्वे फाटकावर पोहोचली. यावेळी  मोरून दुसरी प्रवासी रेल्वे येत होती. दोन्ही गाड्यांचा वेग अधिक होता. याच दरम्यान गीतांजली एक्सप्रेस अनियंत्रित झाल्याने सर्व प्रवासी डब्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. रेल्वेचे डब्बे कोसळणार अशी भीती प्रवाशांमध्ये होती. त्याचवेळी चालकाने समयसूचकता राखत गाडीचे ब्रेक दाबले. त्यामुळे रेल्वेच्या मागील बाजूस असलेला गार्ड डब्बा रुळावरून उतरला.

त्यापुढे असलेल्या डी-२ या प्रवासी कोचमधील प्रवाशांना मोठे धक्के जाणवले. गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीबाहेर पटापट उड्या मारल्या. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सुरू करण्यासाठी तात्काळ मदत कार्य हाती घेण्यात आले होते. मात्र, या घटनेत रेल्वे ट्रॅकचे मोठे नुकसान झाल्याने दोन्ही मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नरखेड-काचीगुडा रेल्वे पडली होती बंद

तीन तारखेला नरखेड येथून पहाटे निघणारी काचीगुडा पॅसेंजर रेल्वे मोर्शी-चांदूरबाजार रस्त्याच्या मध्यात बंद पडल्याने तीन तास परतवाडा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. नरखेड येथून सकाळी निघालेली ही गाडी वरुड येथेच बंद पडलेली होती. परंतु ती गाडी सुरू करून पुढे आणण्याचा प्रयत्न केला असता ती मधातच बंद पडली. त्यामुळे विनाकारणचा त्रास झालेला असल्याचे एका प्रवाशाने सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT