Social Distancing  
अकोला

शासकीय निर्बंधांमुळे ‘शुभमंगल'' झाले शॉर्टकट

सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड : राज्यात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यात अकोला जिल्ह्यातही कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण आटोक्यात नाही आले तर, दिवसाही संचारबदी लागते की काय ? अशी, भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे लग्न समारंभ, जमावबंदी, डीजे, संबळ वाद्य, वऱ्हाडी यासह शुभकार्यावरही गाजावाजा न करता पडदा पडला आहे.

शहरासह ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सिंचे नियम पाळत अगदी साधेपणात ‘शुभमंगल’ होत आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र भीती परसली आहे. प्रशासनाकडून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली असली तरी, ग्रामीण भागात कोरोनाबाबत भीतीचे सावट कायम आहे. सध्या प्रशासनाकडून काही ठराविक शुभकार्यासाठी निर्बंधासह परवानगी असल्याने ग्रामीण भागात नातेवाईकासह वऱ्हाडी मंडळींना उपस्थित राहण्यासाठी संचारबंदी अडसर ठरत असल्याने शुभविवाह शॉर्टकट मध्ये होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे जवळच्या नातेवाईकांना आणि रक्तातील नात्यातील लोकांना या विवाह सोहळ्यास हजेरी लावता येत नाही. यामुळे विवाह सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉलद्वारे नवनवीन शक्कल लढवीत वर व वधूंना शुभेच्छा देण्यात येत आहे. अगदी साद्या आणि सोप्या पद्धत्तीने, गाजावाजा न करता विवाह सोहळे ग्रामीण भागातही होत आहे. फोन वरूनच ‘शुभमंगल सावधान’ म्हणण्याची वेळ लग्नात येऊ न शकणाऱ्या वऱ्हाडी मंडळीवर येत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही महागडे डीजे, संबळ वाद्यांना मोठी मागणी असते. हळद, आणि लग्नाच्या रात्रीला ग्रामीण भागात चालणारी निकासी, वरात वाजंत्र्यासह नाचणाऱ्यांना घाम फोडणारी असते. तरुणांचा या वरातीकडे मोठ्या प्रमाणावर कल असतो. मात्र, अशा परिस्थितीमुळे साऱ्यांचाच हिरमोड झाला आहे. या नियमांमुळे हलाखीच्या परिस्थितीमधील वर-वधूंचे पालक शुभमंगल म्हणत आहेत. मोठा गाजावाजा करून लग्न करू इच्छिणाऱ्यांववर सावधान म्हणण्याची वेळ आली आहे.

कही खुशी कही गम...

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंत छोटेखानी स्वरुपात लग्न होत असल्याने लग्नाच्या अवाढव्य खर्चात बचत होत असल्याने गोरगरीब व सामान्य परिस्थितीचे वर-वधू व त्यांचे कुटुंबीय समाधानी दिसत असून, एक प्रकारे ते कर्जबाजारी होण्यापासून वाचले असेच म्हणावे लागेल. त्यामुळे शासनाचा नियम त्यांच्यासाठी दिलासादायक असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे याच निमयानुसार बिछायत, मंडप, डेकोरेटर्स, मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, आचारी, स्वयंपाकी महिला मंडळी, महाराज, पंडितजी, बँड पथक, साऊंड, डीजे, गायक, ऑर्केस्ट्रा, घोडा, बग्गी, फुलवाले, सजावट, पाणी कॅनवाले, मजूर वर्ग, स्वच्छता कामगार इत्यादींवर उपासमारेची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT