akola  sakal media
अकोला

Akola : ग्रामसेवकाने केला गावाचा कायापालट; विकास निधीचा योग्य वापर

एखाद्या अधिकाऱ्याने मनावर घेतले की अति दुर्गम भागातील हातावर मोजण्या एतक्या लोकवस्ती गावाचाही विकास करू शकतो

श्रीकृष्ण शेगोकार

पातूर (जि. अकोला) : एखाद्या अधिकाऱ्याने मनावर घेतले की, अति दुर्गम भागातील हातावर मोजण्या एतक्या लोकवस्ती गावाचाही विकास करू शकतो. शासनाच्या विविध योजनांच्या निधीची योग्य अंमलबजावणी करून गावाचा कायपालट करण्याची हिम्मत दाखवू शकतो. त्यासाठी कामाप्रति एकनिष्ठ असणारे अधिकारी वर्ग असणे आवश्‍यक आहे. इमानदारी व मेहनतीने काम करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचाही सहभाग असणे गरजेचे आहे. असाच आपल्या कामाचा प्रत्यय कामाप्रति एकनिष्ठ असलेल्या ग्रामसेवकाने घडवून आणला आणि सावरगावाचा विकास बोलू लागला.

तालुक्यातील बुलडाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे गाव असलेले ग्राम सावरगाव येथे अनेक वर्षांपासून सुविधांचा अभाव होता. मात्र, ग्रामसेवक शिवकुमार सर्जे यांनी पदभार हाती घेतला व सावरगाव या गावाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. कर्तव्यदक्ष ग्रामसेवक शिवकुमार सर्जे यांनी गावात शासनाने दिलेल्या निधीमधून स्मशानभूमिला गेट, तार कंपाउंड, पेव्हर ब्लॉक बसविले असून, दलित वस्तीमध्ये अंदाजे २५ लाख रुपयाची महत्त्वाची कामे केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पेव्हर बसविणे, लहान मुलांसाठी असलेल्या अंगणवाडीत विविध कामे करून बोलकी अंगणवाडी तयार केली. तसेच, तांडावस्ती येथे समाजगृह पूर्णत्वास नेले, गावातील नाल्या, रस्ते आदी कामे करून आपली कामावरची निष्ठा व कर्तव्यदक्षता दाखवून ग्रामवासियांची मने जिंकली. ग्रामसेवक शिवकुमार सर्जे व सरपंच बलक यांनी गावात सामाजिक सलोखा राखून, ‘एकच ध्यास गावाचा विकास’ या पद्धतीने काम करत आहेत.

त्यांच्या या कर्तव्यनिष्ठपणामुळे अल्पवधीत सावरगाव येथे अंदाजे ५० लाख रुपयांचे विकास कामे हाती घेतली आहेत. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहे. ग्रामसेवक सर्जे हे गावकऱ्यांना शासनाने दिलेल्या विविध योजनांची माहिती वेळोवेळी देत आहेत. नेहमी सावरगाव येथे आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर राहत असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदी वातावरण आहे. विशेष म्हणजे ग्रामसेवक सर्जे व सरपंच बलक यांनी गत अडीच वर्षाच्या कालावधीत केलेल्या विकास कामाबाबतीत सावरगाव वासियांनी कधीच तक्रार केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT