Gyanjyoti Savitribai Phule of three schools in buldana district has been selected for quality campaign  
अकोला

ज्ञानज्योतीने उजळणार सिंदखेडचे भाग्य; जिल्ह्यातील तीन शाळांची निवड

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (बुलढाणा) : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. यात जिल्हा स्मार्ट ग्राम सिंदखेडचा समावेश आहे. त्यामुळे ज्ञानज्योतीने सिंदखेडचे भाग्य उजळणार असून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातून शंभर आदर्श शाळांची निवड केली जात आहे. या अनुषंगाने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नोडल अधिकारी, ग्राम सामाजिक परिवर्तनाचे जिल्हा समन्वयक आदींची उपस्थिती होती. बैठकीत जिल्हा अभियान परिषदेद्वारे या अभियानासाठी मोताळा तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकळी विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली. या शाळांना भेटी देऊन आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळेचा भौतिक विकास, शाळा समिती बळकटीकरण, आनंददायी शिक्षण होण्यासाठी वरील उपक्रम पूर्ण ताकदीने राबविण्यात येऊन तिन्ही शाळा राज्यात आदर्श कराव्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अभियानाच्या उद्दिष्टांमध्ये विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा म्हणून मुला-मुलींना स्वतंत्र शौचालय, शुद्ध पाणी, हॅन्डवॉश स्टेशन, बसण्यासाठी बेंच, शाळेला संरक्षण भिंत याचा समावेश आहे. तसेच पर्यावरण स्नेही शाळा व आरोग्यासाठी स्वच्छता राबविणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत निकष पूर्ण करणार्‍या शाळेला तीन जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिनी आदर्श शाळा म्हणून निवड करून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या अभियानासाठी सिंदखेडची निवड झाल्याने गावकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी राज्यभरातून शंभर तर, जिल्ह्यातून तीन शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात माझ्या सिंदखेड गावाची निवड झाल्याचा अभिमान आहे. सदर निवडीबद्दल निवड समितीचे आभार. या अभियानात बाजी मारण्यासाठी सिंदखेडची शाळा सर्व निकष पूर्ण करेल अशी ग्वाही देते. 
- सीमा प्रवीण कदम, सरपंच, सिंदखेड (जिल्हा स्मार्ट ग्राम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT