अकोला

अकोला : गारपिटीने झोडपले; वीज कोसळल्याने एक ठार

अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व पातूरमध्ये दाणादाण

सकाळ वृत्तसेवा

अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व पातूरमध्ये दाणादाण

अकोला : जिल्ह्यात (akola district)मंगळवारी (ता. २८) दुपारच्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस(Untimely rain) झाला. यावेळी विजांच्या कडकडाटासह शहरासह जिल्ह्यात गारपीट (hailstorm)झाली. त्यामुळे शेतातील (farm)हरभरा, गहू, तूर, कापूस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. अवकाळी पाऊस (rain)व गारपीट होत असतानाच बाळापूर तालुक्यात वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, तर २१ बकऱ्या दगावल्या. खरीप हंगामात अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान(loss) झाले आहे.

अकोला जिल्ह्यात मंगळवारी (ता. २८) सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. त्यातच दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आकाशात अचानक काळे ढग जमा होऊन, विजांचा कडकडाटसह जोरदार हवा वाहू लागली. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस होत असतानाच ‘बोरा’च्या आकारा इतक्या गारा पडल्या. आकाशातून एकसारख्या गारा पडल्याने रस्त्यांवर व शेतात गारांचा खच पडला. पावसाचा जोर अधिक असल्याने सर्वांचीच दाणादाण उडाली. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ पाऊस होत राहिल्याने अनेक भागात पावसाचे पाणी साचले. शेतात तर पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतातील हरभरा, तूर, गहू पिक अशरक्षः खाली झोपले. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गारपिटीने पळविला.

अकोला तालुक्यात नुकसान

गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसाने अकोला तालुक्यातील हरभरा व कपाशी पिकांची मोठी हानी झाली. तालुक्यातील सीसा मासा, डोंगरगाव, बोरगाव मंजू, कुरणखेड, पळसो, येवता या गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाल्याची माहिती आहे. यामध्ये शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून हरभरा, तूर, कपाशी या पिकांचा समावेश आहे. नुकसान झाल्याने प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होतांना दिसत आहे.

मूर्तिजापूरात अतोनात नुकसान

मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा, कमळणी कमळखेड, धोत्रा शिंदे, धानोरा पाटेकर, अनभोरा, शेंद, बिडगाव, शिवण खुर्द, राजूरा घाटे, मोहखेड, मुरंबा, उमरी अरब आदी गावात अकाली पावसासह गारपीट झाली. काही ठिकाणी बोराच्या आकाराची गार पडली. तासभर गारपीट होऊन काही गावांमध्ये गारांचा खच साचला. या पावसामुळे तूर, हरभरा, गहू, कांदा भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निंभा गावातील तीन गुरांच्या गोठ्यांवर झाडे कोसळल्याने गोठा कोसळून गुरे जखमी झाली, नुकसानाचा पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बार्शीटाकळीत हरभरा, तुरीसह इतर पिकांचे नुकसान

शहरासह तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील हरभरा, कपाशी, गहू व तुरीच्या पिकांसह कांदा, मेथी व भाजीपाल तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील काही घरांवरील टीनपत्रे सुद्धा उडून गेल्याचे प्रकार घडले.

बाळापूर तालुक्यातील पीक मातीमोल

तालुक्यातील व्याळा, रिधोरा, देगाव, टाकळी नांदखेड, बोराळा, बोरवाकडी, कान्हेरी परिसरात जोरदार पाऊस झाला. रिधोरा व व्याळा, बारलिंगा परिसरात वादळी वारा व गारपिटीने शेतीचे अत्यंत नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रिधोरा येथील जिल्हा परिषद शाळेवरील टिनपत्रे उडाली, तर येथील किराणा व हॉटेल व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. तालुक्यातील लोहारा परिसरातही पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच पारस, निंबा फाटा येथेही पाऊस झाला.

वीज पडून २१ बकऱ्यांसह एक ठार

बाळापूर तालुक्यातील सातरगाव शेत शिवारात शेतकरीपुत्र जागीच ठार झाला आहे. रविंद्र चतरसिंग चव्हाण (वय ३०, रा. बाळापूर ) असे मृत्यू झालेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे, तर बटवाडी खुर्द येथील २१ बकऱ्या दगावल्या आहेत. मृतक रवी हा सातरगाव शेतशिवारातील शेतात गेला असताना मंगळवारी दुपारी अचानक पाऊस व विजांचा कडकडाट सुरू झाला. अशातच त्याने कडुलिंबाच्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी अचानक वीज कोसळल्याने रवीचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील बटवाडी खुर्द येथील शेतशिवारात मेंढपाळांच्या कळपातील २१ बकऱ्या दगावल्या आहेत. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील मेंढपाळ बाळापूर तालुक्यात आले आहेत, बकऱ्या दगावल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT