sakal
अकोला

पावसाचे थैमान संपता संपेना; निसर्गाच्या लहरीपणासमोर बळीराजा हतबल

सप्‍टेंबर महिन्‍यात झालेल्‍या पावसामुळे तसेच दोन दिवसांपासून सुरु असलेल्‍या संततधार पावसाने परिसरातील शेती पाण्याखाली गेली असून सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव राजा : सप्‍टेंबर महिन्‍यात झालेल्‍या पावसामुळे तसेच दोन दिवसांपासून सुरु असलेल्‍या संततधार पावसाने परिसरातील शेती पाण्याखाली गेली असून सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत. तर दाण्यांना कोंब फुटले असून कपाशी पिकाची बोंडे काळी पडल्‍याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अनेकानेक आव्हानांना तोंड देत शेतकऱ्यांनी पीके जगवली व आता पीक घरात येणार अशावेळी पावसाने सर्व दाणादाण उडवली आहे.

पिंपळगाव राजा महसूल मंडळात यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असून पिंपळगाव राजा,भालेगाव,ढोरपगाव,पोरज,निपाना,राहुड,जळका भडंग, घाणेगाव, ज्ञानगंगापूर, वाकुड, हिवरा, बेलुरा, तांदुळवाडी यासह इतर गावांमधील शेती पाण्याखाली गेली आहे. ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन पिकांची राखरांगोळी पावसाने झाली आहे.

दोन दिवसांपासून सलग सुरु असलेल्‍या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पिकांचे नुकसान प्रचंड प्रमाणात झालेले दिसत आहे. अल्पभूधारक शेतकरी मेटाकुटीला आला असून शासनाने याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे झाले आहे. सतत सुरु असलेल्‍या पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ढगाळ वातावरणाने पिकांवर रोगराईचे संकट ओढवले असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

"खरिपातील महत्वाच्‍या कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेती पाण्याखाली गेल्‍याने कपाशी व सोयाबीनच्या दाण्यातून कोंब निघत आहेत. त्यामुळे शासनाने शेतीपिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत घ्यावी."- नारायण ठाकरे, शेतकरी, पिंपळगाव राजा

"सततच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले, तरी सुद्धा प्रशासनाला गांभीर्य नाही.अल्पभूधारक शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला असून शेतीचे नुकसान झाले आहे. शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे."- विलास बनसोडे शेतकरी, राहुड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT