how many more victims Terrible accident on Akot-Akola road sakal
अकोला

साहेब, आणखी किती बळी घेणार? अकोट-अकोला रस्त्यावर भीषण अपघात

अकोट-अकोला रस्त्यावर भीषण अपघातात पत्नी ठार; पती गंभीर

सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड : अकोला जिल्ह्यात खराब रस्त्यांमुळे आतापर्यंत अनेक बळी गेले असून, रस्त्यांची परिस्थिती बिकट असल्याने आणि अकोट-अकोला रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रेंगाळले असल्याने त्याचा फटका आणखी एक प्रवाशाला बसला. २१ फेब्रुवारी रोजी कुटासा फाट्याजवळ झालेल्या अपघातात हिवरखेड येथील रहिवाशी वंदना राजेश अग्रवाल या महिलेचा बळी घेतला आहे. असून, या रोडवर आणखी किती बळी घेणार असा प्रश्‍न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हिवरखेड येथील प्रतिष्ठित नागरिक राजेश जयनारायण अग्रवाल हे २१ फेब्रुवारी रोजी रात्री आपल्या पत्नीसह अकोल्यावरून खासगी चारचाकी वाहन क्र. एमएच-४३-एटी-९४०५ हिवरखेडला परत येत होते. रात्री दहा वाजेच्या दरम्यान कुटासा फाटाच्या जवळ समोरून येणाऱ्या वाहनाचा लाईटाचा प्रकाश जास्त असल्यामुळे आणि अचानक खराब रस्ता लागल्याने रस्त्यावरच बांधकाम साहित्याचे आणि गिट्टीचे ढिगारावर वाहन चढून चार ते पाच पलटी घेऊन दुसऱ्या बाजूच्या रस्त्याच्या पलीकडे जाऊन खाली कोसळली.

हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात वंदना राजेश अग्रवाल (वय ४५) यांचा मृत्यू झाला तर, त्यांचे पती राजेश अग्रवाल गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ पोलिस आणि १०८ व कॉल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर पोहचले. आणि अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले. दोन्ही अपघातग्रस्तांना खासगी वाहनातून उपचारार्थ अकोट येथे हलविण्यात आले. वंदना अग्रवाल यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्यावर २२ फेब्रुवारी रोजी हिवरखेड येथे राजस्थानी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जखमी राजेश अग्रवाल यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT